अर्जुननंतर मलायकाला भेटला नवा बॉयफ्रेंड? ‘मिस्ट्री मॅन’च्या हातात हात

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपनंतर आता अभिनेत्री मलायका अरोरा एका नव्या व्यक्तीसोबत दिसली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. मलायकासोबत हा मिस्ट्री मॅन कोण, असा सवाल काहींनी केला आहे.

अर्जुननंतर मलायकाला भेटला नवा बॉयफ्रेंड? मिस्ट्री मॅनच्या हातात हात
अर्जुन कपूर, मलायका अरोरा
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 27, 2024 | 1:17 PM

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती. मात्र काही दिवसांपूर्वीच या दोघांचं ब्रेकअप झालं. ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनदरम्यान अर्जुनने सिंगल असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर मलायकाचा आता एका दुसऱ्या व्यक्तीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून मलायका तिचं अर्जुनसोबतचं ब्रेकअपचं दु:ख विसरल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत दिसणारा ‘मिस्ट्री मॅन’ कोण, हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.

या व्हिडीओमध्ये मलायका तिची बहीण अमृता अरोरासोबत बाहेर फिरायला गेल्याचं दिसतंय. मात्र त्यात सर्वांचं लक्ष एका मिस्ट्री मॅनने वेधलंय. कारण या व्हिडीओत तो मलायकाचं हात आपल्या हातात घेऊन चालत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मलायका एका व्यक्तीलाच डेट करतेय की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तो मलायकाचा मित्र किंवा प्रोफेशनल पार्टनर असू शकतो, असा अंदाज काहींनी वर्तवला आहे.

मलायकाने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टद्वारे तिने तिचं रिलेशनशिप स्टेटस सांगितलं होतं. ‘माझं आताचं स्टेटस..’, असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं आणि त्याखाली तीन पर्याय होते. रिलेशनशिपमध्ये, सिंगल आणि हेहेहेहे (हसणं) असे तीन पर्याय त्याखाली देण्यात आले होते. यापैकी मलायकाने ‘हेहेहेहे’ या पर्यायावर बरोबरची खूण केली होती. दुसरीकडे ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनसाठीच्या एका कार्यक्रमात अर्जुन म्हणाला, “आता सिंगल आहे मी, रिलॅक्स.”

अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर 2018 पासून मलायका अर्जुनला डेट करू लागली होती. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिलं गेलं होतं. वयातील अंतरावरून दोघांना अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. मात्र या ट्रोलिंगलाही न जुमानता त्यांनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला होता. ब्रेकअपच्या चर्चांदरम्यानही अर्जुनने मलायकाच्या आयुष्यातील अत्यंत कठीण परिस्थितीत तिची साथ दिली होती. सप्टेंबर महिन्यात मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी मलायकाचं सांत्वन करण्यासाठी अर्जुन पोहोचला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us