AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“एक Kiss देशील का?”; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लोकल ट्रेनमध्ये घडली धक्कादायक घटना

प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. कॉलेजमधून घरी लोकल ट्रेनने जात असताना तिच्यासोबत ही घटना घडली. मुंबई महिलांसाठी फारशी सुरक्षित नाही, असं तिने म्हटलंय.

एक Kiss देशील का?; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लोकल ट्रेनमध्ये घडली धक्कादायक घटना
मालविका मोहननImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 21, 2025 | 1:39 PM
Share

मुली आणि महिलांच्या विनयभंगाच्या अनेक घटना आपण दररोज ऐकत असतो. याला सेलिब्रिटी किंवा अभिनेत्रीसुद्धा अपवाद ठरत नाहीत. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत एका कार्यक्रमात सहभागी झाली असता गर्दीतल्या एका व्यक्तीने तिचा हात खेचला होता. या घटनेनंतर आता आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवासादरम्यान अभिनेत्रीसोबत ही घटना घडली होती. या घटनेमुळे ती प्रचंड घाबरली होती.

दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही काम करणारी अभिनेत्री मालविका मोहननने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “लोक अनेकदा म्हणतात की मुंबई ही महिलांसाठी सुरक्षित आहे. पण या दृष्टीकोनाबद्दल मला जरा बोलायचं आहे. आज माझी स्वत:ची गाडी आणि ड्रायव्हर आहे. त्यामुळे जर एखादी व्यक्ती मला विचारत असेल की मुंबई सुरक्षित आहे का, तर माझं उत्तर कदाचित हो असेल. पण जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होती आणि ट्रेन किंवा बसने प्रवास करत होती, तेव्हा मला अजिबात सुरक्षित वाटलं नव्हतं.”

“ती घटना मला आजही नीट लक्षात आहे. मी माझ्या दोन मैत्रिणींसोबत लोकल ट्रेनने प्रवास करत होती. तेव्हा कदाचित रात्रीचे 9.30 वाजले होते. आम्ही फर्स्ट क्लासने प्रवास करत होतो आणि त्यावेळी डब्बा तसा रिकामाच होता. आमच्या तिघींशिवाय कम्पार्टमेंटमध्ये कोणीच नव्हतं. मी खिडकीजवळ बसले होते. तेव्हा अचानक एक माणूस आम्हा तिघींना बघून खिडकीच्या ग्रिलजवळ आला. त्याने त्याचा चेहरा ग्रिलजवळ आणून म्हणाला, एक चुम्मा देगी क्या? (एक किस देशील का?) आम्ही तिघी स्तब्ध झालो होतो. अशा परिस्थितीत कसं वागायचं हे त्या वयात समजतही नाही. जर तो आमच्या डब्ब्यात चढला असता तर काय झालं असतं? आपण सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या कोणत्याही महिलेला विचारलं तरी ती असंख्य अशा घटना सांगेल. कोणतीच जागा पूर्णपणे सुरक्षित वाटत नाही”, असं ती पुढे म्हणाली.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान