AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sarath Chandran: 37 वर्षीय अभिनेत्याची राहत्या घरी आत्महत्या; पोलिसांना मिळाली सुसाईड नोट

केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील कक्कड इथल्या राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळला. सरथने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून तो नैराश्यात होता आणि त्यातूनच हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सूचित होतं आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

Sarath Chandran: 37 वर्षीय अभिनेत्याची राहत्या घरी आत्महत्या; पोलिसांना मिळाली सुसाईड नोट
Sarath Chandran: 37 वर्षीय अभिनेत्याची राहत्या घरी आत्महत्याImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 31, 2022 | 1:14 PM
Share

मल्याळम अभिनेता सरथ चंद्रन (Sarath Chandran) शुक्रवारी त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला. अभिनेत्याने (Malayalam film actor) विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सरथ हा 37 वर्षांचा होता. त्याने ‘अंगमली डायरीज’ (Angamaly Diaries), ‘कुडे’ आणि ‘ओरू मेक्सिकन अपरथा’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्याने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. सरथच्या घरातून पोलिसांना एक सुसाईड नोटही मिळाली आहे, ज्यामध्ये त्याच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, असं लिहिलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील कक्कड इथल्या राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळला. सरथने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून तो नैराश्यात होता आणि त्यातूनच हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सूचित होतं आहे, असं पोलिसांनी सांगितलं. सरथ चंद्रनच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेता अँटोनी वर्गीसने ‘अंगमली डायरीज’मधील सरथचे काही फोटो शेअर करत ‘RIP ब्रदर’ असं लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत सरथच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

अभिनेता अँटोनी वर्गीसची पोस्ट

37 वर्षीय सरथ हा ‘अंगमली डायरीज’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्याने ‘कुडे’, ‘ओरू मेक्सिकन अपराथा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मूळचा कोची इथला असलेला सरथ चंद्रन याने सुरुवातीला एका आयटी फर्ममध्ये काम केलं. त्यानंतर डबिंग कलाकार म्हणून त्याने चित्रपटांमध्ये काम केलं. सरथने मल्याळम चित्रपटसृष्टीत अनिस्या या चित्रपटातून पदार्पण केलं.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.