
एक काळ असा होता जेव्हा माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्या ड्रग्स प्रकरणाने सर्वत्र खळबळ माजली होती. याप्रकरणी जय मुखी याला देखील अटक करण्यात आली होती. 2016 मध्ये NDPS कायद्याखाली मुंबई आणि गुजरात पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर जय मुखी याने तळोजा आणि अहमदाबादच्या तुरुंगात त्यांनी 8 वर्ष शिक्षा भोगली. याच दरम्यान त्याच्या पत्नीने जय याची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. जय याच्या पत्नीने त्याच्या न कळत कंपनी विकल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. जय याच्या पत्नीचं नाव बिजल असं आहे.
जय याची ‘इन्फिनिटी लॉजिस्टिक’ नावाची कंपनी ठाण्यात होती. त्यात जय आणि बिजल दोघे संचालक होते. जय तुरुंगात असताना बिजलने 1 फेब्रुवारी 2018 ला आपल्या आई जस्मीन यांना कंपनीत अतिरिक्त संचाल म्हणून नेमलं. जय यांना माहिती न देता कंपनीचं ठाण्यातलं ऑफिस तब्बल 60 लाख रुपयांमध्ये परस्पर विकलं. याप्रकरणी जायला कळलं असता त्याने ठाणे येथील नवापाडा पोलीस ठाण्यात तक्रार दखल केली आहे.
याप्रकरणी माहिती देत जय म्हणाला, “मी तुरुंगात असतानाच बिजलने माझी बनावट सही करून हे सगळं केलं. मी 2017 मध्ये कोर्टात सही करण्यास नकार दिला होता, तेव्हा तिने माझ्या वडिलांचं औषध बंद करण्याची धमकी दिली होती.”, याप्रकरणा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
2017 मध्ये ठाणे पोलिसांनी ममता कुलकर्णी आणि ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामी यांच्याविरुद्ध अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. ममता कुलकर्णी ही डॉन दाऊद इब्राहिमचा गुंड छोटा राजनच्या प्रेमात होती. अनेक वर्ष तिने छोटा राजनला डेट केलं. मात्र, जेव्हा छोटा राजननं भारत देश सोडला होता त्यानंतर ममता आणि त्याचं नातं संपलं. छोटा राजन नंतर ममता ड्रग माफिया विकी गोस्वामीला डेट करत असल्याची देखील चर्चा रंगली होती. आता अभिनेत्री संन्यास घेतला आहे. पण संन्यास घेण्यापू्र्वी ममता अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली.