AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला देवीप्रमाणे पुजायचे चाहते; का झाली तिची अशी अवस्था?

अभिनय, डान्स आणि आपल्या ग्लॅमरस अदांनी ९० च्या दशकातील काही अभिनेत्रींनी चाहत्यांना घायाळ केलं. पण एका चुकीमुळे अभिनेत्रीने गमावला चाहत्यांचा विश्वास... आता कुठे आहे 'ती' अभिनेत्री?

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला देवीप्रमाणे पुजायचे चाहते; का झाली तिची अशी अवस्था?
| Updated on: Apr 27, 2023 | 2:32 PM
Share

मुंबई : ९० च्या दशकातील काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांची आजही चाहत्यांमध्ये तुफान चर्चा रंगत असते. अभिनय, डान्स आणि आपल्या ग्लॅमरस अदांनी ९० च्या दशकातील काही अभिनेत्रींनी चाहत्यांना घायाळ केलं. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ममता कुलकर्णी. ममता कुलकर्णी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी होती. फक्त चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील अभिनेत्रीच्या प्रेमात होते. पण ममता हिच्योसबोत कोणत्याही सेलिब्रिटीची प्रेम कहाणी पूर्ण होवू शकली नाही. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या तर मोठी होतीच पण, चाहते अभिनेत्रीला एखाद्या देवीप्रमाणे पुजायचे. पण अभिनेत्रीने एक चूक केली आणि चाहत्यांचा विश्वास गमावून बसली. जेव्हा अनेक वर्षांनंतर ममता दिसली तेव्हा तिला साध्वीच्या रुपात पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.

९० च्या दशकात चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींच्या मनात ममताने घर केलं होतं. झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख ममता तिच्या आईमुळे बनवू शकली. वृत्तपत्रात आलेली एक जाहिरात पाहून ममताची आई लेकीला ऑडिशनसाठी घेवून ठरलेल्या ठिकाणी गेल्या. तेव्हापासून ममता हिला अनेक मॉडलिंगच्या ऑफर्स येवू लागल्या. मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने अभिनयाकडे स्वतःचा मोर्चा वळवला.

1991 मध्ये ममता साऊथ सिनेमा ‘नानबर्गल’ च्या माध्यमातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली. त्यानंतर १९९२ मध्ये अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये ममताला अधिक लोकप्रियता मिळाली नाही. पण दुसऱ्या साऊथ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री एका रात्रीत स्टार झाली. अभिनेत्रीच्या दुसऱ्या साऊथ सिनेमाचं नाव होतं ‘प्रेम शिकारम’..

दुस-याच सिनेमातून ममता कुलकर्णीने साऊथमध्ये इतकी प्रसिद्धी मिळवली की लोक तिच्या सौंदर्य आणि अभिनयाचे गोडवे गाऊ लागले. अभिनेत्रीच्या प्रत्येक गोष्टीने चाहत्यांना प्रभावित होत होते. ममताची प्रसिद्धी एवढी वाढली की चाहत्यांनी हैदराबादमध्ये तिचे मंदिर बांधलं, ज्यामध्ये तिला एखाद्या देवी प्रमाणे चाहते पुजायचे.

एकीकडे ती तिच्या करियरमध्ये यशाचे शिखर चढत होती, तर दुसरीकडे तिच्या एका निर्णयाने चाहत्यांना धक्का दिला. ममताने एका मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी टॉपलेस फोटोशूट केलं. जे चाहत्यांना आवडलं नाही. अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोशूटचा वाद टोकाला पोहोचल्यानंतर अभिनेत्रीने सर्वांसमोर येऊन सर्वांची माफी मागितली.

झगमगत्या विश्वात सक्रिय असताना अभिनेत्रीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन सर्वांसमोर आले. ममता कुलकर्णी आणि डॉन छोटा राजन यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला. मात्र काही दिवसांनी अभिनेत्री साथीदार विकी गोस्वामीसोबत दुबई आणि केनियामध्ये असल्याचं समजलं. ममता कुलकर्णीच्या कारकिर्दीतील शेवटचा सिनेमा ‘कभी हम कभी तुम’ होता. या सिनेमानंतर ममता कुलकर्णी झगमगत्या विश्वापासून दूर झाली.

त्यानंतर २०१३ मध्ये ममता कुलकर्णी अशा रुपात सर्वांसमोर आली की तिला पाहून सर्वांना मोठा धक्का बसला. तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ममताने भगव्या रंगाचे कपडे घातले होते. मात्र, ममता आणि विकी गोस्वामी यांच्यावर केनियामध्ये ड्रग रॅकेट चालवल्याचा आरोप असल्याचं कळलं. पोलीस दोघांचा शोधात असल्याची देखील चर्चा सुरु आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.