Mamta Kulkarni: आमिर खान माझ्या बेडरुममध्ये येऊन… ए. आर. रहमानच्या वादात ममता कुलकर्णीने सांगितलं इंडस्ट्रीतलं मोठं सत्य

Mamta Kulkarni: संगीतकार ए.आर. रेहमान यांच्या सांप्रदायिक वक्तव्यानंतर पूर्व अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने इंडस्ट्रीतलं मोठं सत्य सांगातलं. म्हणाली, 'आमिर खान माझ्या बेडरुममध्ये येऊन...'

Mamta Kulkarni: आमिर खान माझ्या बेडरुममध्ये येऊन... ए. आर. रहमानच्या वादात ममता कुलकर्णीने सांगितलं इंडस्ट्रीतलं मोठं सत्य
Mamta Kulkarni
| Updated on: Jan 31, 2026 | 8:33 AM

Mamta Kulkarni: अभिनेता आमिर खान याच्याबद्दल वक्तव्य करणारी पूर्व अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, ममता कुलकर्णी आहे. सांगायचं झालं तर, ऑस्कर विजेते आणि लोकप्रिय संगीतकार ए.आर. रेहमान यांच्या सांप्रदायिक वक्तव्यानंतर फक्त सिनेविश्वातच नाही तर, राजकारणात देखील खळबळ माजली. अनेकांनी रेहमान यांच्या वक्तव्याचा विरोध केला, तर अनेकांनी समर्थन केलं. याच वादादरम्यान ममता कुलकर्णी हिने 1990 च्या दशकातील बॉलिवूडच्या आठवणी ताज्या केल्या. ममता हिने अभिनेता आमिर खान आणि शाहरुख खान यांच्यासोबत असलेल्या जुन्या आठवणी देखील ताज्या केल्या.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ममता कुलकर्णी म्हणाली, 1990 च्या दशकातील सिनेमाच्या सेटवर काम करण्याच्या अनुभवाबद्दल ममता हिने सांगितंल. एवढंच नाही तर, त्या काळात, चित्रपट उद्योगात व्यावसायिक आणि वैयक्तिक जागा अनेकदा एकमेकांशी जुळत असत. सोबतच ए. आर. रेहमान यांच्या वक्तव्यावर देखील ममता हिने प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली ममता कुलकर्णी?

आमिर खान याच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल ममता कुलकर्णी म्हणाली, ‘पूर्वी होत असलेल्या शुटिंग दरम्यान आज ज्या सुविधा आहेत, त्या सुविधा नव्हत्या… व्हॅनिटी व्हॅन देखील फार कमी होत्या. कलाकार कायम मूलभूत सुविधांसाठी एकमेकांच्या घरावर अवलंबून राहायचे. ‘बाजी’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान आमिर खान याच्या लोखंडवाला येथील त्याच्या घरी आम्ही जायचो… आमिर माझ्या बेडरुममध्ये कपडे बदलायचा… आणि पॅकअप झाल्यानंतर त्याच्या किचनमध्ये चहा आम्ही बनवायचो…’

कधी धर्म पाहिला नाही – ममता कुलकर्णी

ममता कुलकर्णी म्हणाली, ‘मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते कारण 1990 च्या दशकात मी काम केलं आहे. मी आमिर खान याच्यासोबत काम केलं आहे. शाहरुख खान याच्यासोबत काम केलं आहे. आम्ही कधीच एकमेकांचा धर्म पाहिलेला नाही. जेव्हा आम्ही आमिर खान आणि शाहरुख खानसोबत वर्ल्ड टूरला जायचो, तेव्हा आम्ही एकमेकांच्या घरी बसायचो, कोणी चहा बनवत असायचं, कोणी जेवण बनवत असायचं.’

ए.आर. रेहमान यांच्यावर काय म्हणाली ममता?

ए.आर. रेहमान यांच्या वक्तव्यावर ममता कुलकर्णी म्हणाली, ‘बॉलिवूडमध्ये माझा अनुभव फार वेगळा होता. ज्या इंडस्ट्रीला मी ओळखत होती, ती इंडस्ट्री अशी विभागलेली कधीच नव्हती. जर ए.आर.रेहमान यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. असं असू शकतं ती, तुमच्या प्रकारचे संगीत आता कदाचित प्रासंगिक नसेल. आजकाल, इतके चांगले गायक कामा शिवाय घरी बसले आहेत.’ असं देखील ममता म्हणाली.