AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिरा बेदीने शेअर केले मालदीवमधील काही खास व्हिडिओ, फिटनेसबाबत लोकांकडून कौतूक

मंदिरा बेदी हिने सोशल मीडियावर मालदीवच्या व्हेकेशनचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ती तिच्या मुलांसोबत पूल आणि समुद्राचा आनंद घेताना दिसत आहे. लोक तिच्या फिटनेसचे कौतूक करत आहेत. याशिवाय सिंगल पॅरेंटिंगचे ही कौतुक करत आहेत. चाहत्यांनी तिला बाँड चित्रपटात प्रयत्न करण्याचा सल्लाही दिला आहे.

मंदिरा बेदीने शेअर केले मालदीवमधील काही खास व्हिडिओ, फिटनेसबाबत लोकांकडून कौतूक
| Updated on: Oct 31, 2024 | 4:37 PM
Share

मंदिरा बेदी हिने काही फोटो शेअर केले आहे. सध्या ती मालदीवमध्ये व्हेकेशनवर आहे. मालदीवमधून तिने अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या दोन्ही मुलांसोबत दिसत आहेत. आपल्या जिवलग मैत्रिणीसोबत अनेकदा व्हेकेशन प्लॅन करणारी मंदिरा आता आपल्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. मंदिराने अनेक व्हिडिओ शेअर केलेत. या व्हिडिओमध्ये मंदिरा समुद्रावर बांधलेल्या रिसॉर्टच्या पूलमध्ये पाणी आणि सूर्यप्रकाश दोन्हीचा आनंद घेताना दिसत आहे.

फिट आणि स्लिम मंदिरा बेदी

मालदीवमधील व्हिडिओ शेअर केल्यानंतर मंदिराच्या या व्हिडिओवर लोकं पोस्टला खूप पसंत करत आहेत. या झलकमध्ये मंदिरा खूपच फिट आणि स्लिम दिसत आहे. या वयात देखील इतकी स्टनिंग कशी दिसू शकते असा प्रश्न ही लोकांनी केला आहे. काही लोकांनी तिला सल्ला दिला आहे की ती इतकी फिट आहे की तिने बाँड चित्रपटासाठी प्रयत्न करावेत.

View this post on Instagram

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

व्हिडिओमध्ये मंदिरा मुलांसोबत मस्ती करताना दिसत आहे. ती मुलांसोबत पूलमध्ये उडी मारतानाही दिसत आहे. सर्वोत्कृष्ट उडी कोणी मारली, असा प्रश्नही तिने विचारला आहे. मंदिरा ज्या पद्धतीने आपल्या दोन्ही मुलांचे संगोपन करत आहे आणि त्यांना सिंगल पॅरेंटचे प्रेम देत आहे, ते पाहून लोकांनी तिचे खूप कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले की- तुम्ही तुमच्या मुलांची किती छान काळजी घेत आहात.

View this post on Instagram

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

राज कौशल यांचे 2021 मध्ये निधन

2021 मध्ये मंदिरा बेदी हिचा पती राज कौशल यांचं निधन झालं होतं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. आता ती दोन्ही मुलांचे संगोपन एकटीच करत आहे. लग्नाच्या सुमारे 13 वर्षानंतर, 2011 मध्ये त्यांना एक मुलगा वीर झाला आणि 2020 मध्ये त्यांनी तारा ही 4 वर्षांची मुलगी दत्तक घेतली, जी आता 8 वर्षांची आहे.

View this post on Instagram

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.