AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनीष पॉल याचा धक्कादायक खुलासा, थेट ‘या’ ठिकाणी केले अक्षय कुमार याने अपमानित, म्हणाला

बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा काही दिवसांरपूर्वीच सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अक्षय कुमार हा दिसला होता. मात्र, अक्षय कुमार याच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि अक्षय कुमार याचा हा चित्रपट फ्लाॅप गेला.

मनीष पॉल याचा धक्कादायक खुलासा, थेट 'या' ठिकाणी केले अक्षय कुमार याने अपमानित, म्हणाला
| Updated on: Jul 23, 2023 | 10:02 PM
Share

मुंबई : मनीष पॉल हा एक अभिनेता असण्यासोबतच तो अनेक शो होस्ट करतो. शो होस्ट करत असताना उपस्थितांचे जोरदार मनोरंजन करताना देखील मनीष पॉल (Maniesh Paul) हा कायमच दिसतो. मनीष पॉल याने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. इतकेच नाही तर अनेक मोठ्या बाॅलिवूडच्या (Bollywood) पुरस्कार सोहळ्यांना देखील होस्ट करताना कायमच मनीष पॉल हा दिसतो. सोशल मीडियावर मनीष पॉल याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. विशेष म्हणजे आता मनीष पॉल हे एक अत्यंत मोठे नाव आहे. मनीष पॉल हा सोशल मीडियावर देखील सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो.

आता नुकताच मनीष पॉल याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमुळे मनीष पॉल हा चर्चेत आलाय. या मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा करताना मनीष पॉल दिसलाय. विशेष म्हणजे तब्बल दहा वर्षांनंतर त्याने यावर भाष्य केले आहे. एका पुरस्कार सोहळ्यातील किस्सा हा मनीष पॉल सांगताना दिसतोय. हे सांगताना मनीष पॉल हा भावूक झाल्याचे देखील बघायला मिळाले.

मनीष पॉल म्हणाले की, हा किस्सा साधारण दहा पूर्वीचा आहे. एक पुरस्कार सोहळा होता आणि बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा स्टेजवरून खाली येत असताना मी त्याला प्रश्न विचारण्यासाठी त्याच्या जवळ गेलो. मात्र, त्यावेळी अत्यंत रागामध्ये मला शांत बसण्यास अक्षय कुमार याने सांगितले. त्यानंतर मला खूप जास्त वाईट वाटले.

विशेष म्हणजे त्या पुरस्कार सोहळ्यात माझी आई उपस्थित होती. पहिल्यांदाच माझी आई अशा कोणत्या तरी कार्यक्रमात आली होती आणि तिच्यासमोरचा माझा अपमान करण्यात आला. यामुळे मी खूप जास्त दु:खी झालो. दोन मिनिटे मला काय बोलावे हेच कळत नव्हते. ते माझे सुरूवातीचे दिवस होते.

मला वाटले की, आता माझ्या करिअरचे काहीच होणार नाही. मात्र, मी त्यानंतर माझा शो पुढे व्यवस्थित केला. मी अक्षय कुमारला याबद्दल बोललो की, सर मी तुम्हाला दुसरे काहीच बोलणार नव्हतो. फक्त अभिनयाच्या टिप्स या तुमच्याकडून घेणार होतो. त्यानंतर बऱ्याच वेळानंतर अक्षय कुमार म्हणाला की, मी फक्त मजाक करत होतो. पण मला माहितीये की, ते अजिबातच मजाक हे करत नव्हते.

Follow Us
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा