AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्त येईपर्यंत मारलं, गोणीत घालून त्याला..; ढसाढसा रडत मंजरी फडणीसने सांगितली घटना, अंगावर येईल काटा!

अभिनेत्री मंजरी फडणीसने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये तिने अत्यंत अस्वस्थ करणारी घटना सांगितली आहे. तिच्या इमारतीतील एका श्वानाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.

रक्त येईपर्यंत मारलं, गोणीत घालून त्याला..; ढसाढसा रडत मंजरी फडणीसने सांगितली घटना, अंगावर येईल काटा!
मंजरी फडणीसImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 10, 2026 | 8:23 AM
Share

‘जाने तू या जाने या’ चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री मंजरी फडणीसने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यातून अत्यंत धक्कादायक घटना सांगितली आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना सांगताना मंजरी हमसून हमसून रडली. या अभिनेत्रीच्या इमारतीमधील माइकी नावाच्या एका श्वानाला काही लोकांनी अत्यंत क्रूरपणे मारल्याची घटना घडली आहे. मुंबईतील अंधेरी इथं मंजरी राहते आणि तिच्या परिसरातील एका श्वानाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. माइकीच्या हत्येनंतर प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून मंजरी फडणीसने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या अमानुष कृत्याने ती अत्यंत व्यथित आणि दु:खी झाल्याचं या व्हिडीओत पहायला मिळतंय. मंजरीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, ‘माइकीच्या मारेकऱ्याला सोडणार नाही’ असा इशारा तिने दिला आहे.

व्हिडीओत मंजरीने काय म्हटलंय?

“आमच्याकडे माइकी नावाचा एक कुत्रा होता. 2019-2020 पासून तो आमच्या सोसायटीचा भाग बनला होता. अचानक एकेदिवशी तो गायब झाला. आम्ही त्याला खूप शोधलं, ठिकठिकाणी पोस्टर्स लावले, गार्ड्सशी बोललो. अखेर इथे राहणाऱ्या एका व्यक्तीनं आम्हाला त्याच्यासोबत जे घडलं, ते सांगितलं. माइकी इमारतीच्या बेसमेंटमध्ये शांत झोपला होता. पण काही क्रूर लोकांनी त्याच्या डोक्यात मोठ्या काठीने किंवा सळीने प्रहार केला. त्याने पळण्याचा प्रयत्न केला असता त्या व्यक्तीने त्याचा पाठलाग करत त्याला मारलं. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं होतं, त्याला उलट्या होऊ लागल्या होत्या. इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर त्या लोकांनी त्याला एका पोत्यात घालून खाडीच्या परिसरात फेकून दिलं. तेव्हाही तो जिवंत होता. तो वाचला असता की नाही हे माहीत नाही, पण आम्ही त्याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला”, असं ती हुंदके देत रडत सांगते.

मंजरीचा व्हिडीओ-

मुक्या श्वानाची इतक्या निर्दयीपणे हत्या करणाऱ्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी मंजरीने यावेळी केली. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘आमच्या माइकीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आम्ही त्याच्यासाठी लढू. कोणत्याही श्वानासोबत असं कधीच घडू नये.’ मंजरीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आणि सेलिब्रिटींनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी