‘पागल है क्या? फोटो खिंचवाने थोडी आये?’ अभिनेता मनोज वाजपेयी एअरपोर्टवर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर संतापले
अभिनेता मनोज वाजपेयींचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये मनोज एअरपोर्टवर पापाराझींवर संतापलेले दिसत आहेत. फोटो काढणाऱ्या पापाराझींना त्यांनी चांगलंच सुनावलं आहे. सेलिब्रिटींना सतत फॉलो करण्याच्या वृत्तीवर मनोज वाजपेयींनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांमध्ये त्याची प्रचंड चर्चा आहे.

सेलिब्रिटी कुठेही असले तरी पापाराझीं त्यांचा पाठलाग करतच असतात. सेलिब्रिटींचा एअरपोर्ट लूक क्लिक करण्यासाठी एअरपोर्टवरच उपस्थित असतात. त्यावेळी अनेक सेलिब्रिटी फोटोंसाठी पोज देऊन निघून जातात तर काही सेलिब्रिट पापाराझींच्या या सतत फॉलो करण्यावर नाराज होतात. असंच काहीसं घडलं अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यासोबत. एअरपोर्टवर मनोज वाजपेयी पापाराझींवर संतापलेले पाहायला मिळाले.
मनोज वाजपेयी पापाराझींवर संतापले
अभिनेता मनोज वाजपेयी त्यांच्या दमदार अभिनय आणि चित्रपटांसाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी त्यांच्या शैलीने ते नेहमीच चाहत्यांची मने जिंकली आहेत. अलिकडेच त्यांचा जुगनुमा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या मनोज बाजपेयी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ते पापाराझींवर संतापलेले , त्यांच्यावर चिडलेले दिसत आहेत.
View this post on Instagram
पापाराझी त्यांचे फोटो क्लिक करताच ते चिडले
मनोज वाजपेयी यांना पापाराझींनी एअरपोर्टवर स्पॉट केले. तेव्हा त्यांचे फोटो काढण्यासाठी पापाराझी पुढे आले. तेव्हा मनोज त्यांच्यावर चिडताना दिसत आहेत. मनोज यांनी पांढऱ्या रंगाची शर्ट-पॅन्ट घातले होते. त्यांच्या शर्टवर फ्लोरल प्रिंट पाहायला मिळाली. डोळ्याला काळा गॉगल लावून डॅशिंग लूकमध्ये ते एअरपोर्टवर स्पॉट झाले. त्यावेळी मनोज यांना पाहताच पापाराझी त्याच्याभोवती गराडा घालून त्यांचे फोटो काढू लागले. हे पाहून मनोज संतापले आणि पापाराझींवर चिडले. ते म्हणाले, “पागल है क्या? फोटो खिंचवाने थोडी आये है…” असे बोलून त्यांनी कॅमेरा बंद करण्याचा इशारा केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तसेच नेटकरी देखील त्यावर कमेंट करत आहेत.
कामाबद्दल बोलायचं तर,
मनोज वाजपेयी यांनी आजवर अनेक हिट चित्रपट आणि वेब सीरिज केल्या आहेत. ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या माध्यमातून मनोज यांनी प्रेक्षकांना त्यांच्या भूमिकेची आणि त्यांच्या अभिनयाची एक वेगळी झलक दाखवली. आता लवकरच मनोज पुन्हा एकदा ‘फॅमिली मॅन 3’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
