Manoj Tiwari: वयाच्या 51 व्या वर्षी तिसऱ्यांदा बाबा झाले मनोज तिवारी; पत्नीने मुलीला दिला जन्म

'लक्ष्मीनंतर घरात सरस्वती आली'; मुलीच्या जन्मानंतर मनोज तिवारी यांनी शेअर केला पहिला सेल्फी

Manoj Tiwari: वयाच्या 51 व्या वर्षी तिसऱ्यांदा बाबा झाले मनोज तिवारी; पत्नीने मुलीला दिला जन्म
Manoj Tiwari: वयाच्या 51 व्या वर्षी तिसऱ्यांदा बाबा झाले मनोज तिवारी
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 13, 2022 | 2:50 PM

मुंबई: भोजपुरी सुपरस्टार आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. मनोज तिवारी यांची पत्नी सुरभी तिवारीने 12 डिसेंबर रोजी मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर सेल्फी शेअर करत मनोज यांनी चाहत्यांना ही गोड बातमी दिली. मनोज यांनी रुग्णालयातील पत्नीसोबतचा सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. मुलीच्या जन्माचा आनंद व्यक्त करत त्यांनी पोस्ट लिहिली.

‘अत्यंत आनंदाने मी हे सांगू इच्छितो की माझ्या घरात लक्ष्मीनंतर सरस्वतीचं आगमन झालं आहे. आज पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्यावर तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असू द्या’, अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला. वयाच्या 51 व्या वर्षी ते तिसऱ्यांदा पिता बनले आहेत.

सुरभी तिवारी या मनोज तिवारी यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. मनोज आणि त्यांची पहिली पत्नी रानी यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीपासून मनोज यांना एक मुलगी आहे. घटस्फोटानंतर 2020 मध्ये त्यांनी भोजपुरी गायिका सुरभीशी लग्न केलं.

काही दिवसांपूर्वीच मनोज यांनी सोशल मीडियावर पत्नीच्या डोहाळं जेवणाचे फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये सुरभी यांच्या चेहऱ्यावरील आनंद सहज पहायला मिळतोय.

भोजपुरी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय गायक आणि अभिनेता म्हणून काम केल्यानंतर मनोज तिवारी यांनी 2009 मध्ये पहिली निवडणूक लढवली. समाजवादी पार्टीच्या तिकिटावर त्यांनी ही निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.