
एनडीए (NDA) सरकारचा शपथविधी अगदी काही वेळात सुरू होतोय. नरेंद्र मोदी हे आज सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या शपथविधीचे आमंत्रण अनेक कलाकारांना मिळाले आहे. अनुपम खेर हे सलग तिसऱ्यांदा या शपथविधी सोहळ्यासाठी पोहचले आहेत. आता नुकताच या शपथविधीसाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत पोहचली आहे. कंगना राणावत हिने मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवली आणि विशेष बाब म्हणजे या निवडणूकीमध्ये मोठ्या लीडने कंगना राणावत निवडून देखील आली.
शाहरूख खान हा देखील या शपथविधी सोहळ्यासाठी पोहचला आहे. अनेक बॉलिवूड कलाकार हे या शपथविधीसाठी पोहचताना दिसत आहेत. अनेकांना या शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपल्याला सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण आल्याचे सांगितले आणि खास फोटोही शेअर केला.
साऊथ स्टार रजनीकांत हे देखील या शपथविधीसाठी पोहचले आहेत. रजनीकांत यांनी नरेंद्र मोदी यांना या शपथविधी सोहळ्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत नरेंद्र मोदी यांना शपथविधी सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच इतरही मंडळी मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
#WATCH | Delhi: Actor Rajinikanth says, “I am going to take part in the swearing-in ceremony… It is a very historic event. I congratulate PM Modi Ji for becoming the prime minister for the consecutive third time…” pic.twitter.com/zdcrdZ2kSm
— ANI (@ANI) June 9, 2024
फक्त अजय देवगण आणि रजनीकांत हेच नाही तर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अजय देवगण याच्या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. लोक नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत आहेत. हेमा मालिनी यांनी देखील भाजपाकडून निवडणूक लढवली आणि त्या विजयी ठरल्या.
Congratulations to Prime Minister @narendramodi Ji on his re-election! Wishing continued success in guiding India towards prosperity and greatness with his wisdom and compassion.
— Ajay Devgn (@ajaydevgn) June 9, 2024
कंगना राणावत निवडणुकीमध्ये विजयी ठरल्यानंतर अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कंगना राणावत हिला शुभेच्छा दिल्या होत्या. फक्त अनुपम खेर हे सोडले तर कंगना राणावत हिला इतर कोणीही बॉलिवूडमधून शुभेच्छा दिल्या नाहीत. कंगना राणावत हिने पहिल्यांदाच भाजपाकडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ती विजयी देखील झाली.