AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगर”सेवकां”चा पगार 25 हजार, नाही हो परवडत, Fortuner चा हफ्ताच 30 हजार, आस्ताद काळेच्या कानपिचक्या

आस्ताद काळे स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीड भूमिकेबद्दल मनोरंजन विश्वात ओळखला जातो. (Aastad Kale Maharashtra Corporators)

नगरसेवकांचा पगार 25 हजार, नाही हो परवडत, Fortuner चा हफ्ताच 30 हजार, आस्ताद काळेच्या कानपिचक्या
अभिनेता आस्ताद काळे
| Updated on: Apr 29, 2021 | 3:52 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील नगर”सेवकां”चा पगार फार तर 25 हजार रुपये इतका आहे, तर फॉर्च्युनर (Fortuner) गाडीचा हफ्ताच 30 हजार असतो, असं म्हणत अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) याने राजकारण्यांना कानपिचक्या लगावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून आस्तादने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करत फॉलोअर्सच्या डोक्याला खाद्य पुरवलं आहे. (Marathi Actor Aastad Kale express anger on Maharashtra Corporators and Politicians)

“आत्ता महाराष्ट्रातील ‘नगर”सेवकां”‘चा पगार (सरकारी पगार) हा फार फार तर 25 हजार रुपये इतका आहे. A grade Municipal Corporation मधल्यांचा. ज्यात पुणे, मुंबई, आणि नागपूर येतात. आता पुण्यात, मुंबईत मी खूप राहिलोय. 25 हजार रुपयांत हे असं राहणीमान नाही हो परवडत!!! Fortuner चा हफ्ताच 30 हजार वगैरे असेल!! (जर द्यायचा असेल तर अर्थात!!)” अशी पोस्ट आस्तादने इन्स्टाग्रामवर लिहिली आहे.

पाहा इन्स्टाग्राम पोस्ट :

(Aastad Kale Maharashtra Corporators)

“नागडे राजकारणी…नागडं सरकार”

“प्रश्न विचारायचे आहेत…स्वत्व जपायचं आहे…. कदाचित जीव गमवावा लागू शकतो…कारण.. श्शु!!! कुठे काही बोलायचं नाही…. अरे हाड….. आम्ही प्रश्न विचारणार…. सत्तेच्या आणि सत्तेत्ल्या प्रत्येकाला…. उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार…… नागडे राजकारणी…नागडं सरकार… निरोप घेतो….” अशी पोस्ट आस्तादने कालच केली होती.

आस्ताद काळे स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीड भूमिकेबद्दल मनोरंजन विश्वात ओळखला जातो. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात तो सहभागी झाला असताना त्याची सडेतोड वृत्ती पाहायला मिळाली होती. याआधीही आस्तादने कोरोना काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये घेतलेल्या विधानसभा निवडणुका, त्यासाठी घेण्यात आलेल्या प्रचारसभा, राजकीय नेत्यांनी काढलेल्या मिरवणुका यावर भाष्य केले होते.

आस्ताद काळेच्या गाजलेल्या कलाकृती

आस्ताद काळे नुकताच चंद्र आहे साक्षीला मालिकेत संग्रामच्या भूमिकेत झळकला होता. काम देण्याबाबत सोशल मीडियावर त्याने केलेली पोस्टही चर्चेचा विषय ठरली होती. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा आणि सिंगिंग स्टार या म्युझिकल रिअॅलिटी शोचा तो फायनलिस्ट होता. असंभव, पुढचं पाऊल, सरस्वती यासारख्या मालिका, दमलेल्या बाबाची कहाणी, फर्जंद यासारख्या चित्रपटांतील त्याच्या भूमिका गाजल्या आहेत. अभिनेत्री स्वप्नाली पाटीलसोबत तो नुकताच विवाहबंधनात अडकला.

संबंधित बातम्या :

“अत्यंत घाण भाषेत आम्हीही रिअ‍ॅक्ट होऊ शकतो” प्रेक्षकाच्या अश्लाघ्य टीकेवर अभिनेता शशांक केतकर संतापला

VIDEO | “तू बुधवार पेठेतील ** आहेस” इन्स्टाग्राम युझरच्या कमेंटवर मानसी नाईकचं लाईव्ह उत्तर

(Marathi Actor Aastad Kale express anger on Maharashtra Corporators and Politicians)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...