
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळे याने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी राणीच्या बागेतील हंबोल्ट पेंग्विनच्या जोडीन 3 पिल्लांना जन्म दिला. त्यानंतर त्यांची नावे नॉडी,टॉम आणि पिंगु अशी ठेवण्यात आली. मात्र, भाजपच्या कार्यकत्यांनी मार्चा काढून हे नावे मराठी का ठेवली नाही असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर अस्तादने आता सोशल मीडियावर पेंग्विनशी संबंधीत खोचक पोस्ट शेअर केली आहे.
काय आहे अस्तादची पोस्ट?
अस्ताद काळेने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर खेळण्यातील पेंग्विनचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने, ‘हे पेंग्विन माझ्या मुलाचं, THUNDER/कडकडाट/गडगडाट याचं लाडकं खेळणं आहे. तर याचं नाव काय ठेवावं हे कृपया राज्यकर्त्यांनी/त्यांच्या पक्षातील जाणकार संस्कृतीरक्षकांनी सांगावं. ता.क:- हे आणायला जाता-येतानाच्या रस्त्यावर खूप खड्डे होते. आजही आहेत. पाणी तुंबतंही’ असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर त्याची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
वाचा: पती सिव्हिल सर्व्हिस अधिकार, टूरिझम कंपनी… 500 पाक हेरांचं स्वप्न पाहणारी ती ‘मॅडम N’ कोण?
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट
सोशल मीडियावर अस्तादची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने, ‘अक्षर सांगा काय दिलेय बारशाला , मग सांगतो आम्ही सगळे’ असे मजेशीर अंदाजात म्हटले आहे. तर बाकी यूजर्सने अस्तादचे बरोबर आहे असे म्हटले आहे.
राणीच्या बागेतील पेंग्विन
राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विन्सची सधअया कार्टूनच्या पात्रांवरुन नाव ठेवण्यात आली आहेत. मोल्ड, डोनाल्ट, डेसी, पोपॉय, ऑलिव्ह, कोको, स्टेला, डोरा, सिरी, अॅलेक्सा, फ्लिपर, निमो, जेरी, बिंगो, ओरिओ आणि बबल अशी पेंग्विन्सची नावे आहेत. पण जेव्हा नावांवरुन वाद झाला तेव्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या कर्टून विश्वातील नावे वापरल्यामुळे पेंग्विन मुलांच्या आधिक आवडीचे आणि ते त्यांच्याशी जोडले जातील या उद्देशाने नाव ठेवण्यात आली आहे. तसेच या पिल्ल्यांचा नावासहीत माहिती दिल्लीला देण्यात आली आहे असे सांगितले.