AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राजक्ता माळीनंतर आणखी एका अभिनेत्याने पुण्यात घेतलं घर, दाखवली घराची झलक, नेमप्लेट पाहून…

प्राजक्ता माळीनंतर आणखी एका अभिनेत्याने पुण्यात घेतलं घर, थेट व्हिडीओद्वारे चाहत्यांना दाखवली घराची झलक. अनेकजण करत आहेत कौतुक. कोण आहे तो अभिनेता?

प्राजक्ता माळीनंतर आणखी एका अभिनेत्याने पुण्यात घेतलं घर, दाखवली घराची झलक, नेमप्लेट पाहून...
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 21, 2026 | 2:55 PM
Share

बॉलिवूडसह मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांची मुंबई, पुणे अशा ठिकाणी स्वत:ची घरं आहेत. अशातच नुकतेच प्राजक्ता माळीने मुंबईत एक नवीन घर खरेदी केलं आहे. प्राजक्ता माळीनंतर आणखी एका अभिनेत्याने पुण्यात घर खऱेदी केल्याची बातमी समोर आली आहे. ‘कैसी ये यारियां’ आणि ‘कसौटी जिंदगी की 2’ या मालिकांमधून लोकप्रिय झालेला अभिनेता पार्थ समथान यानेही आपल्या आयुष्यातील हे खास स्वप्न पूर्ण केलं आहे. पार्थने त्याच्या मूळ गावी म्हणजेच पुण्यात आलिशान डुप्लेक्स घर खरेदी केलं आहे.

पार्थने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या नव्या घराची झलक चाहत्यांना दाखवली. या व्हिडीओमध्ये तो आईसोबत नव्या घरात प्रवेश करताना दिसत आहे. रिबन कटिंगपासून घरातील विविध भागांचा होम टूरही त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पार्थच्या घराच्या नेमप्लेटवर त्याचं आडनाव ‘लघाटे’ असल्याचं दिसून येतं. पुण्यात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

‘माझ्या प्रत्येक यशामागे आईचा हात’

नव्या घराचा व्हिडीओ शेअर करताना पार्थने आपल्या आईबद्दलही भावुक भावना व्यक्त केल्या. ‘स्वप्ने नक्कीच पूर्ण होतात. मला माझ्या शहरात, पुण्यात स्वप्नातील घर मिळालं आहे. माझ्या प्रत्येक यशामागे माझ्या आईचा हात आणि तिचीच प्रेरणा आहे,’ अशा आशयाचं कॅप्शन त्याने लिहिलं.

पार्थचं नवीन घर प्रशस्त आणि आलिशान असून त्यात मोठ्या खोल्या आणि प्रशस्त बाल्कनी आहे. बाल्कनीतून आजूबाजूचा सुंदर परिसर पाहता येतो. घराच्या वरच्या मजल्याचीही झलक त्याने व्हिडीओमध्ये दाखवली. सध्या घराचं पूर्ण इंटिरिअरचं काम बाकी असल्याचं दिसत आहे.

आईने दिला घर घेण्यासाठी प्रोत्साहन

पार्थने सांगितलं की, आई-वडिलांचं घर हे आपल्यासाठी कायमच आपलं असतं. मात्र आयुष्यात एका टप्प्यावर स्वतःची ओळख, भविष्य आणि जबाबदाऱ्या लक्षात घेऊन स्वतःचं घर असणंही महत्त्वाचं ठरतं. पुण्यातील हे घर त्याच्यासाठी केवळ एक प्रॉपर्टी नसून एका मोठ्या स्वप्नाची पूर्तता आहे.

मुंबईतही पार्थचं स्वतःचं घर आहे. मात्र पुण्यात गुंतवणूक करण्यासाठी त्याच्या आईने त्याला प्रोत्साहन दिल्याचं त्याने सांगितलं. नव्या घराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, मित्र आणि चाहत्यांनी पार्थवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

Follow Us
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून...
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून जोरदार बॅनरबाजी
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर इस्कॉन...
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर...  इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत...
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत... नेमकं काय घडलं?
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकली...
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकलीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी बैठक
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय...
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?