
The Kerala Story 2 Goes Beyond: ‘द केरला स्टोरी’ सिनेमानंतर आता ‘द केरला स्टोरी 2’ सिनेमा प्रेक्षकांना वास्तव दाखवत आहे… ‘द केरला स्टोरी 2’ सिनेमात तीन मुलींसोबत घडलेली घटना दाखवण्यात आली आहे. मध्यप्रदेश, केरळ आणि राजस्थान येथील मुलींना कशा प्रकारे प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं जातं आणि त्या कशा प्रकारे धर्मांतराला बळी पडतात याबद्दल देखील दाखवण्यात आलं आहे. सिनेमात दाखवण्यात आलेलं वास्तव मन विचलित करणारं आहे, सांगायचं झालं तर, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी यावर मोठं वक्तव्य केलं आहे, सिनेमा फक्त द्वेष पसरवणारा आहे… असं त्यांनी म्हटलं आहे. तर स्वतःचं मत स्पष्टपणे मांडणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी लहान मुलांनी देखील ‘द केरला स्टोरी 2’ सिनेमा पाहिला पाहिजे असं सांगितलं आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी सिनेमा मन सुन्न करणारा आहे… असं सांगितलं आहे…
व्हिडीओ पोस्ट करत शरद पोंक्षे म्हणाले, नमस्कार मी आता ‘द केरला स्टोरी 2’ सिनेमा बघितला…. विपूल शाह यांनी निर्मिती केलेला आणि कामाख्या नारायण सिंह यांनी दिग्दर्शित केलेला… अप्रितिम सिनेमा… मन सुन्न करणारा सिनेमा… मला असं वाटतं जगामध्ये असा एकमेव देश असेल जिथे, बहुसंख्य हिंदू लोकांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. आता या सिनेमाबद्दल कोणीही सेलिब्रिटी, हिंदी सिनेमतला मोठा स्टार बोलणार नाही… बोललं पाहिजे… प्रत्येकाने सिनेमा पाहिला पाहिजे… आपल्या मुलांना हा सिनेमा दाखवा… केरला स्टोरीसारखे सिनेमा आले पाहिजेत… चित्रपट हे अत्यंत सशक्त माध्यम आहे…डोळ्यामध्ये अंजन घालणारं माध्यम आहे. सिनेमातील सगळ्या घटना वास्तवतेला घरुन आहेत. एकही काल्पनिक नाही… जे आजूबाजूला घडत आहे… तेच त्यांनी सिनेमात दाखवलं आहे. आवश्य बघा ‘द केरला स्टोरी 2’, सर्वांनी सिनेमा पाहण्याचं आवाहन शरद पोंक्षे यांनी केलं आहे.
असा व्हिडीओ पोस्ट करत शरद पोंक्षे म्हणाले, ‘हा सिनेमा सर्वांनी पहायला हवा.आपल्या मुलांना दाखवायला हवा सुन्न करणारा विचार करायला भाग पाडणारा. ‘द केरला स्टोरी 2’, शरद पोंक्षे यांच्या पोस्टवर अनेकांना कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘द केरला स्टोरी 2’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. सिनेमात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील उत्तम कारमगिरी करत आहे.