Vijay Kadam: अभिनेते विजय कदम यांचं निधन, सिनेविश्वात शोककळा

Vijay Kadam Passed Away: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर... मराठी चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त...

Vijay Kadam: अभिनेते विजय कदम यांचं निधन, सिनेविश्वात शोककळा
| Updated on: Aug 10, 2024 | 10:56 AM

Vijay Kadam Passed Away: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज पहाटं निधन झालं आहे. विजय कदम यांच्या निधनामुळे मराठी सिनेविश्व आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 1980 आणि 90 काळात एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे…

मराठी सिनेविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावल्याने सिनेविश्व आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 2 वाजता विजय कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. अंधेरी येथील स्मशानभूमीत विजय कदम यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

 

विजय कदम यांन वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी सकाळ विजय कदम यांनी अंधेरी येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. विजय कदम गेल्या दीड वर्षापासून कर्करोगाशी लढा देत होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्यावर उपचार सुरु होते. विजय कदम यांचा पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. विजय कदम यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

 

 

विजय कदम यांच्या सिनेविश्वातील योगदानाबद्दल सांगायचं झालं तर, आपल्या विनोदबुद्धीने त्यांनी चाहत्यांना हसवलं. ‘आम्ही दोघे राजा राणी’, ‘चष्मेबहाद्दर’, ‘पोलीसलाईन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं.

 

एकेकाळी रंगभूमी देखील गाजवणारे विजय कदम यांचा ‘विच्छा माझी पुरी कर’ हे लोकनाट्या तुफान गाजलं… रंगभूमी, सिनेमांमध्ये काम करत असताना विजय कदम यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण आता त्यांच्या निधनावर चाहते आणि सेलिब्रिटी देखील शोक व्यक्त करत आहेत.