लाडकी ‘जेनी’ वृत्तनिवेदिकेच्या भूमिकेत, ‘नो ब्रेकिंग न्यूज’मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणार!

कंटाळवाण्या बातम्यांमध्ये रंग भरण्यासाठी शर्मिलाने चक्क तांदूळ निवडत बातम्या दिल्या आहेत.

लाडकी ‘जेनी’ वृत्तनिवेदिकेच्या भूमिकेत, 'नो ब्रेकिंग न्यूज'मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणार!
Harshada Bhirvandekar

|

Oct 22, 2020 | 7:10 PM

मुंबई : वृत्तनिवेदकाच्या वेगवेगळ्या शैलीचे प्रहसन करणारी, आणि न्यूज चॅनल वर दिल्या जाण्याऱ्या बातम्यांचे व्यंग करत विनोद निर्मिती करणारी ‘नो ब्रेकिंग न्यूज’ ही वेब मालिका “व्हायरस मराठी”वर सुरू झाली आहे. अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदे (Marathi Actress Sharmila rajaram) ही “व्हायरस मराठी” या प्रसिद्ध युट्युब चॅनेलवरील ‘नो ब्रेकिंग न्यूज’ या नव्या शोमध्ये वृत्तनिवेदिकेची भूमिका करत आहेत. (Marathi Actress Sharmila rajaram shinde  will play news anchor in web series)

सादरीकरणाची पद्धत आणि त्यातला तोच तोचपणा याला कंटाळून चक्क बातम्या देताना तांदूळ निवडण्याचे काम करत शर्मिला राजाराम प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. कंटाळवाण्या बातम्यांमध्ये रंग भरण्यासाठी शर्मिलाने चक्क तांदूळ निवडत बातम्या दिल्या आहेत. हा शो आणि तिची वृत्तनिवेदनाची पद्धत प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत असून, सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठी आणि न्यूज विश्वात ज्या पद्धत्तीने बातम्या दिल्या जातात, त्या बातम्यांचे विषय या सगळ्यावर विनोदी पद्धतीने ही मालिका भाष्य करते. निवेदनाच्या आणि सादरीकरणाच्या अनोख्या शैलीमुळे या मालिकेला तरुणांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.शर्मिलाने या आधी व्हायरस मराठी सोबत संतोष कोल्हे दिग्दर्शित ‘शॉक कथा’ या मालिकेसाठी काम केले असून, ती मालिका सुद्धा प्रचंड गाजली होती.( Marathi Actress Sharmila rajaram shinde  will play news anchor in web series)

व्हायरस मराठीवर वेब सीरीजचा धमाका!

व्हायरस मराठीच्या या वेब शोचे लेखन, युगंधर देशपांडे यांनी केले असून दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे. “नो ब्रेकिंग न्यूज”चे आतापर्यंत 2 एपिसोड व्हायरस मराठीवर प्रदर्शित झालेले असून त्याचा तिसरा एपिसोड शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या त्याच्या ट्रेलरवरून या भागात काय घडणार आहे याची किंचित कल्पना प्रेक्षकांना आलीच असेल. लॉकडाऊनच्या काळात सगळे वर्क फ्रॉम होम करत असून, जर वृत्तनिवेदक वर्क फ्रॉम होम करू लागले तर ते कशाप्रकारे बातम्या देतील, हे या शोमध्ये विनोदी पद्धतीने दाखवले गेले आहे.

(Marathi Actress Sharmila rajaram shinde  will play news anchor in web series)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें