लॉकडाऊनमुळे मराठी कलाकार पुण्यात अडकला, न खचता भाजीवाला बनला, नाचत-गात भाजीविक्री

लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार संकटात आला आहे. त्यापैकीच एक कलाकार असा आहे, जो रस्त्यावर उतरुन चक्क भाजी विकत आहे.

लॉकडाऊनमुळे मराठी कलाकार पुण्यात अडकला, न खचता भाजीवाला बनला, नाचत-गात भाजीविक्री

मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार (Celebrity Roshan Shinge Selling Vegetable) संकटात आला आहे. त्यापैकीच एक कलाकार असा आहे, जो रस्त्यावर उतरुन चक्क भाजी विकत आहे, ते सुद्धा सर्वांचे मनोरंजन करत. रोशन शिंगे असं कलाकाराचं नाव आहे. रोशनने कुठलीही लाज न बाळगता चक्क भाजी विकण्याचा व्यवसाय सुरु केला (Celebrity Roshan Shinge Selling Vegetable) आहे.

भाजी विकणारे अनेक जण तुम्ही पाहिले असतील, पण रोशन सारख्या कलाकाराला कधी भाजी विकताना बघितलं नसेल. त्याचबरोबर कोरोना विषयी जनजागृतीही करत आहे. त्यामुळे ज्यांना भाजी घ्याची नसेल, त्यांचे देखील लक्ष रोशन वेधून घेत आहे. रोशन पुण्यातल्या चंदन नगरमध्ये भाजी विक्री करत आहे.

रोशनचे भाजी विकतानाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. खरतर रोशन हा भाजीविक्रेता नाही, रोशन हा एक कलाकार आहे. तो मुबंईच्या विक्रोळी येथील टागोरनगर या भागात राहातो. पुण्यात एका सिनेमाच्या शोसाठी गेला आणि त्यातच लॉकडाऊनमध्ये तिकडेच अडकला. तो सध्या पुण्यामध्ये आपल्या बहिणीकडे राहात आहे (Celebrity Roshan Shinge Selling Vegetable).

लॉकडाऊनमध्ये जगण्यासाठी काय करावे, असा विचार त्याने केला आणि थेट भाजी विकायला सुरवात केली. भाजी विकताना देखील त्याच्यातला कलाकार काही शांत बसला नाही. भाजी विकताना त्याने आपल्या कलाकारीचा चांगलाच उपयोग केला आहे. लॉकडाऊनमध्ये त्याच्या करिअरला मोठा फटका बसला आहे. तरी सुद्धा तो खचला नाही.

भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु करुन तो संकटात ठामपणे उभा राहून आपल्या कलेची जाणीव करुन देत आहे. हे सर्व करण्यासाठी रोशन हा रात्रीच्या वेळेस भाजी मार्केटमध्ये भाजी विकत घ्यायला जातो. सकाळी 5 वाजल्यापासून तो भाजी विकायला सुरवात करतो. लॉकडाऊनमध्ये तो आपला संपूर्ण दिवस आता भाजी विकण्यात घालवत आहे (Celebrity Roshan Shinge Selling Vegetable).

संबंधित बातम्या :

YRF | यशराजचा ‘तो’ सिनेमा आपटला, तरीही सुशांतला 40 लाख जास्त का?

Vidyut Jammwal | ‘हॉटस्टार’ने दुजाभाव केल्याचा आरोप, अभिनेता विद्युत जामवालची नाराजी

अक्षय, अजय, आलियाचे चित्रपट ‘हॉटस्टार’वर, तब्बल 700 कोटींची डील

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *