अक्षय, अजय, आलियाचे चित्रपट 'हॉटस्टार'वर, तब्बल 700 कोटींची डील

'कोरोना'मुळे थिएटर कधी उघडणार माहित नाही, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मोठ्या स्टार्सने डिजीटल प्लॅटफॉर्म निवडला आहे. (Biggest Bollywood stars Movies to be released on OTT Platform Hotstar)

अक्षय, अजय, आलियाचे चित्रपट 'हॉटस्टार'वर, तब्बल 700 कोटींची डील

मुंबई : ‘कोरोना’ संकटात ‘हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मची बॉलिवूडला साथ लाभणार आहे. अक्षय कुमार, अजय देवगण, आलिया भट, अभिषेक बच्चन, वरुण धवन अशा दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट थेट ‘हॉटस्टार’वर रिलीज करण्यासाठी करार झाले आहेत. (Biggest Bollywood stars Movies to be released on OTT Platform Hotstar)

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने जवळपास साडेतीन महिन्यांपासून सिनेमागृह बंद आहेत. ती इतक्यात उघडण्याची शक्यता नसल्याने अनेक मोठे चित्रपट निर्माते चित्रपट डिजिटल प्रदर्शित करण्याचा मार्ग निवडत आहेत.

अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाची तब्बल 130 कोटींची डील झाल्याची चर्चा आहे. तर अजय देवगणच्या ‘भूज’ सिनेमाचीही 125 ते 130 कोटींना खरेदी झाल्याचं म्हटलं जातं.

अजय देवगणची निर्मिती असलेला आणि राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला ‘छलांग’ चित्रपटाची अंदाजे 70 कोटी रुपयांना डील झाल्याचं म्हणतात. तर अजयचीच निर्मिती असलेला आणि अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेला ‘बिग बुल’ अंदाजे 80 कोटींना विकला गेल्याची माहिती आहे.

कोणाची कितीला डील? (अंदाजे आकडे)

अक्षय कुमार – लक्ष्मी बॉम्ब – 130 कोटी
अजय देवगण – भूज – 125 ते 130 कोटी
वरुण धवन – कुली नंबर 1 – 120 कोटी
अभिषेक बच्चन – बिग बुल – 80 कोटी
अभिषेक बच्चन – ल्यूडो – 80 कोटी
राजकुमार राव – छलांग – 70 कोटी
सुशांतसिंग राजपूत – दिल बेचारा – 70 कोटी
आलिया भट – गंगूबाई काठियावाडी –
आलिया भट – सडक 2

बॉलिवूडमधील अनेक मोठे स्टार आज दुपारी 4.30 वाजता बॉलिवूड लाईव्ह येणार आहेत. अक्षय कुमार, अजय देवगण, आलिया भट, अभिषेक बच्चन, वरुण धवन हॉटस्टारवर लाईव्ह असणार. हॉटस्टार सध्याच्या घडीची सर्वात मोठी घोषणा करण्याची चिन्हं आहेत.

‘कोरोना’मुळे थिएटर कधी उघडणार माहित नाही, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मोठ्या स्टार्सने डिजीटल प्लॅटफॉर्म निवडला आहे. (Biggest Bollywood stars Movies to be released on OTT Platform Hotstar)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *