‘रितेश देशमुख यांनी राजकारणात न येता…’, ‘आपला बायोस्कोप’ मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Aapla Bioscope 2023 : 'टीव्ही9 मराठीचा 'आपला बायोस्कोप 2023' मोठ्या दिमाखात पडला पार, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रितेश देशमुख याला सांगितलं, 'रितेश देशमुख यांनी राजकारणात न येता...', सध्या सर्वत्र मुख्यमंत्री यांच्या वक्तव्याची चर्चा..

मुंबई | 1 डिसेंबर 2023 : गुरुवारी ‘टीव्ही9 मराठीचा ‘आपला बायोस्कोप 2023’ हा पुरस्कार सोहळा अत्यंत दिमाखात आणि उत्साहात पार पडला. यावेळा मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्या दरम्यान अनेक नामवंत कलाकारांचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक कलाकारांना सन्मानित करण्यात आलं. ‘वेड’ सिनेमासाठी अभिनेता रितेश देशमुख याला सन्मानित करण्यात आलं. रितेश याचं पुरस्कार देवून सन्मान केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेत्याला मोठा सल्ला दिला आहे. शिवाय ‘आपला बायोस्कोप – मराठी टीव्ही अँड फिल्म अवॉर्ड्स-२०२३’ पुरस्कार सोहळ्याचं देखील कौतुक केलं आहे. सध्या सर्वत्र एकनाथ शिंदे यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
‘आपला बायोस्कोप – मराठी टीव्ही अँड फिल्म अवॉर्ड्स-२०२३’ पुरस्कार सोहळ्याती काही फोटो पोस्ट करत एकनाथ शिंदे म्हणाले, ‘आयोजित केलेल्या ‘आपला बायोस्कोप – मराठी टीव्ही अँड फिल्म अवॉर्ड्स-२०२३’ या कार्यक्रमाला उपस्थित राहून या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले.’
View this post on Instagram
‘यावेळी अभिनेता निर्माता रितेश देशमुख याला वेड या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तर सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून सुभेदार या सिनेमाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांना सन्मानित करण्यात आले. टीव्ही ९ मराठी ही वृत्तवाहिनी कायमच लोकहिताचे प्रकल्प, उपक्रम राबवित असते.’
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मराठी चित्रपट आणि रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांमध्ये खूप टॅलेंट आहे. या कलाकारांना विशेष पुरस्कार सोहळा आयोजित करून त्यांचा गौरव केल्याबद्दल टीव्ही ९ वृत्तवाहिनीचे अभिनंदन केले. चांगले काम करणाऱ्या माणसाचे अशाप्रकारे कौतुक झाले की त्याला अजून चांगले काम करून दाखवण्यासाठी प्रोत्साहन मिळते.’
रितेश देशमुख याचं कौतुक करत मु्ख्यमंत्री म्हणाले, ‘रितेश देशमुख यांना दोन पुरस्कार मिळाले, त्यांनी राजकारणात न येता चित्रपट क्षेत्र निवडले आणि ते यशस्वी झाले याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना कधीही न भेटता धर्मवीर या सिनेमात अभिनेते प्रसाद ओक यांनी त्यांचे हुबेहूब काम केले याबद्दल त्यांचेही विशेष कौतुक आहे. या क्षेत्राच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून त्यांना लागेल ती सहकार्य करण्यासाठी आपण तयार असल्याचे सांगितले.’ असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
‘टीव्ही9 मराठीचा ‘आपला बायोस्कोप 2023’ पुरस्कार सोहळ्यात टीव्ही ९ नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक वरूण दास, टीव्ही ९ मराठीचे संपादक उमेश कुमावत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता रितेश देशमुख यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते.
