AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कान फेस्टिव्हल गाजवणाऱ्या छाया कदम यांचे पाऊल पडते पुढे…; अभिनयासह आता…

Actress Chhaya Kadam Debut in Production : अभिनेत्री छाया कदम यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'बारदोवी' आगामी सिनेमातून अभिनेत्री छाया कदम यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेसह सहनिर्माितीची जबाबदारी छाया कदम यांनी पेलली आहे. वाचा...

कान फेस्टिव्हल गाजवणाऱ्या छाया कदम यांचे पाऊल पडते पुढे...; अभिनयासह आता...
छाया कदम, अभिनेत्रीImage Credit source: Instagram
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jul 10, 2024 | 1:37 PM
Share

दमदार अभिनयासाठी अभिनेत्री छाया कदम यांचं नाव घेतलं जातं. अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. अलीकडेच त्यांची भूमिका असलेला चित्रपट कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. अभिनेत्री म्हणून उत्तम काम करतानाच आता छाया कदम यांच्या कारकिर्दीत नवं वळण आलं आहे. बारदोवी या आगामी चित्रपटाची सहनिर्मिती छाया कदम यांनी केली आहे. तर या चित्रपटातील प्रमुख भूमिकेतही त्या आहेत. 2 ऑगस्टला भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

छाया कदम मुख्य भूमिकेत

चित्रपटाच्या पोस्टरवर शाल पांघरून करारी नजरेनं पाहणारी स्त्री दिसते. ही भूमिका छाया कदम यांनी साकारली आहेत. छाया कदम यांची आतापर्यंतची प्रत्येक भूमिका वेगळी आहे आणि सर्वच भूमिकांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. छाया यांची आजवरची कारकिर्द पाहता त्यांनी निर्मितीसाठी आणि अभिनेत्री म्हणून निवडलेला बारदोवी हा चित्रपट त्याच धाटणीचा असल्याचा अंदाज पोस्टर पाहून बांधता येतो. चित्रपटाचं पोस्टर अत्यंत लक्षवेधी आहे. त्यामुळे आता 2 ऑगस्टला चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्याची प्रतीक्षा प्रेक्षकांना करावी लागणार आहे.

सिनेमा कधी रिलिज होणार?

बारदोवी या आगामी हिंदी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. सतोरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत बारदोवी या चित्रपटाची निर्मिती कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित माणिक शिवाजी वायकर, संदीप बाबूराव काळे, एल्विन राजा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर छाया कदम सहनिर्मात्या आहेत. तर संतोष बळीराम तांबे, रविराज शिवाजी वायकर, अभिजित सुमन वसंत पाटील, नितीन पाटील सहायक निर्माता आहेत. 2 ऑगस्टला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

करण शिवाजीराव चव्हाण यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचे छायाचित्रण विक्रम पाटील यांनी केलेले आहे. तर कार्यकारी निर्माता म्हणून विकास डीगे हे आहेत. छाया कदम यांच्यासह चित्रपटात चित्तरंजन गिरी, विराट मडके यांच्यासारखे कसलेले कलावंत आहेत.

Follow Us
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....