मुंबई : ‘श्री क्षेत्र रायरेश्वर…’ संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील पवित्र,पांडवकालीन जागृत देवस्थान, महाराष्ट्रातील भोर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यात असलेलं, साताऱ्यातील वाईपासून जवळच किल्ले रायरेश्वराचे स्थान आहे. याच किल्ले रायरेश्वरावर शंभू महादेवाच्या साक्षीनं, बाल शिवाजींनी आपल्या 12 सवंगड्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तारीख होती 26 एप्रिल 1645.
आज हे सगळं सांगण्याचं विशेष कारण म्हणजे आगामी मराठी चित्रपट ‘रावरंभा’… हा चित्रपट आपल्या ऐतिहासिक शाहूनगरीतील पहिला ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटाचं पटकथा संवाद लेखन श्री प्रताप दादा गंगावणे यांचं असून, चित्रपटात दिग्दर्शक अनुपजी जगदाळे हे दिग्दर्शकाची भूमिका पार पाडणार आहेत. सातारा शहरातील आणि भारतातील प्रसिद्ध टॉप गियर ट्रान्समिशन प्रा. ली. चे संचालक श्री शशिकांत शिला भाऊसाहेब पवार हे ,शशिकांत पवार प्रोडकशन्स या निर्मिती संस्थेद्वारे या क्षेत्रात पदार्पण करत आहेत.
अभिनेत्री मोनालिसा बागल प्रमुख भूमिकेत
या चित्रपटाचं पहिले पोस्टर प्रदर्शित झालं तेव्हापासून या चित्रपटाविषयी अनेक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढणार आहे, याचं कारण म्हणजे या चित्रपटातील एका प्रमुख कलाकाराची ओळख आता प्रेक्षकांसोबत होणार. तर प्रेक्षकांसाठी सरप्राइज म्हणजे या चित्रपटात मराठमोळी सुंदर अभिनेत्री मोनालिसा बागल प्रमुख भूमिकेत झळणार आहे. ही बातमी ऐकताच तुम्हालाही प्रचंड आनंद झाला असेलच.
नुकतंच काही दिवसांपूर्वी या बहुचर्चित ,महत्वकांक्षी आणि भन्नाट चित्रपटाचा स्क्रिप्ट पूजन सोहळा पार पडला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सोहळा शंभू महादेवाच्या साक्षीनंआणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेल्या पावन भूमीत संपन्न झालाय. या खास प्रसंगी श्री प्रताप दादा गंगावणे, अनुपजी जगदाळे,अभिनेत्री मोनालिसा बागल, ‘थोर इतिहासकार भोर’चे श्री दत्ताजी जगदाळे साहेब,उद्योजक मंगेश दादा जाधव,अभिनेत्री अश्विनी बागल, ‘धर्मवीर युवा मंचा’चे अध्यक्ष प्रशांत नलावडे, निर्माते शशिकांत शिला भाऊसाहेब पवार यांच्यासह संपूर्ण टीम उपस्थित होती.
चित्रपटात नामवंत कलाकार असून,त्यांची नावं अद्याप गुलदस्त्यात आहेत. रिपोर्ट्स नुसार लवकरच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे तमाम रसिक मायबाप,मित्र,आप्तेष्ट,यांचे आशीर्वाद घेऊन लवकरच ‘रावरंभा’ आपल्या भेटीला येत आहे.
संबंधित बातम्या
‘मला नट म्हणून घडवण्यात शाहीर साबळेंचा मोठा वाटा’, अभिनेते भरत जाधव यांनी शेअर केल्या आठवणी!
Video : ‘टकाटक’नंतर आता ‘एक नंबर’ चित्रपटाची धूम, मोशन पोस्टर सोशल मिडियावर प्रदर्शित
किस्से : दोन वेळा जीवघेण्या अपघातातून बचावलेत अशोक सराफ, चित्रपटांपासून दूर सध्या करतायत ‘हे’ काम!