अखेर अशोक सराफ यांनी व्यक्त केली मनातील इच्छा, थेटच म्हणाले…

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत आपल्या अभिनय कारकिर्दीतील एक खंत व्यक्त केली. अनेक संस्मरणीय भूमिका साकारूनही, त्यांना अजूनही 'पूर्णपणे वेड्या' व्यक्तीची आणि 'पत्थर दिल व्हिलन'ची भूमिका साकारायची आहे. 'खरा वारसदार'मधील भूमिकेचा अनुभव त्यांनी शेअर करत, अशा वेगळ्या भूमिका करण्याची त्यांची तीव्र इच्छा असल्याचे सांगितले.

अखेर अशोक सराफ यांनी व्यक्त केली मनातील इच्छा, थेटच म्हणाले...
Ashok Saraf
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2026 | 6:00 PM

अभिनयाचे सम्राट अशोक अर्थात अभिनेते अशोक सराफ यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. वजीर, अरे संसार संसारमधील व्हिलन असेल, भस्ममधील मुलांच्या शिक्षमासाठी धडपड करणारा शंकर असेल, पोलीस अधिकारी असेल, बेरकी व्यक्तिमत्त्व असेल, कॉमेडियन असेल अशा अनेक रुपात अशोक सराफ मोठ्या पडद्यावर दिसले आहेत. पण अशोक सराफ यांना अजूनही हाती काही चांगलं लागलं नाही याची खंत आहे. त्यांना अनेक कॅरेक्टर करायची आहेत. पण त्यापैकी दोन कॅरेक्टर करण्याची त्यांची प्रचंड इच्छा आहे. हे कॅरेक्टर करायचं राहून गेल्याचं खुद्द अशोक सराफ यांनी सांगितलंय.

अशोक सराफ यांनी एका मीडिया हाऊसला मुलाखत दिली. त्यात त्यांनी दोन रोल करायचे राहून गेल्याची खंत व्यक्त केली. एक म्हणजे मेंटर रिटार्यमेंट झालेला व्यक्ती आणि दुसरा म्हणजे पत्थर दिल व्हिलन करायचा राहिल्याचं त्यांनी म्हटलंय. मी बरेच रोल केले. बरेच करायचे राहिले आहेत. मी अजून मेंटल रिटार्यमेंट कॅरेक्टर नाही दाखवलं. खरा वारसदारमधील कॅरेक्टर भ्रमिष्टाचं होतं. वेडसर व्यक्ती होता, पण तसा वेडसर नव्हता. मेंटली डिस्टर्ब नव्हता. मला ठार वेड्याचा रोल करायचा आहे. तसेच पत्थर दिल व्हिलन करावासा वाटतो, असं अशोक सराफ यांनी सांगितलं.

Loading...

तो रोल परत करायला आवडेल

कोणता रोल परत करायला आवडेल असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं त्याने सर्वच अवाक् झाले. अशोक सराफ यांच्या ज्या भूमिकेचा कुणी विचारच केला नाही, ती भूमिका करायला आवडेल असं त्यांनी म्हटलंय. बरीच कॅरेक्टर्स आहेत. मी एक सिनेमा केला होता. खरा वारसदार. त्यात तो वेडा असतो. चांगल्या मुलीसोबत त्याचं लग्न होतं, तो रोल करायला आवडेल, असं अशोक सराफ म्हणाले.

लेखकाने या वेड्याच्या तोंडी पल्लेदार वाक्य लिहिली होती. मी म्हटलं हे असं कसं? वेडा माणूस पल्लेदार वाक्य कसे बोलेल? त्याच्या वाक्यात तुटकपणा असेल. तो वाक्य बनवण्याचा प्रयत्न करेन. मी ती सर्व वाक्य परत लिहिली. मोठा लेखक होता लिहिणारा. मी तू… मला.. अ… अ… अशी तुटक वाक्य आणि अभिनय असं मिक्स केलं. नंतर तिच्या सहवासात आल्यावर तो सुधारत जातो. ते जे होतं…त्यातील जी डेव्हल्पमेंट आहे ती करायला मजा आली. काही दिवसानंतर, महिने, वर्ष गेल्यावर तो कसा बोलत असेल आणि शेवटी तो बरा झाल्यावर कसा बोलत असेल याचं ते स्थित्यंतर हे मी त्यात दाखवलं. ते करताना मजा आली. असं काही मिळालं तर परत करायला आवडेल, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us