Boyz 3: ‘बॉईज 3’मध्ये साऊथचा तडका; चित्रपटाचा धमाल ट्रेलर पाहिलात का?

विदुलाचा कमाल अंदाज, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड यांच्या उत्कृष्ट अभिनयाने रंगलेला हा चित्रपट येत्या 16 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Boyz 3: बॉईज 3मध्ये साऊथचा तडका; चित्रपटाचा धमाल ट्रेलर पाहिलात का?
Boyz 3: 'बॉईज 3'मध्ये साऊथचा तडका
Image Credit source: Youtube
| Edited By: | Updated on: Aug 24, 2022 | 3:55 PM

बॉईज चित्रपटाच्या सीरिजने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर या त्रिकुटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. ‘बॉईज’ आणि ‘बॉईज 2’ ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्यानंतर आता ‘बॉईज 3’ (Boyz 3) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) प्रदर्शित झाला. ‘बॉईज 3’च्या ट्रेलरमध्ये हे त्रिकुट आणि विदुला करत असलेल्या प्रवासाची झलक पाहायला मिळत आहे. लुंगीतलं हे कमाल त्रिकूट दक्षिण दिशेला (South) करत असलेल्या प्रवासाची ही गोष्ट आहे. त्यांच्या या प्रवासात आलेलं विदुला नावाचं वळण कोणत्या ठिकाणी या तिघांना घेऊन जाणार ते चित्रपट पाहिल्यानंतरच कळणार. विदुलाचा कमाल अंदाज, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड यांच्या उत्कृष्ट अभिनयाने रंगलेला हा चित्रपट येत्या 16 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटातील ‘लग्नाळू 2.o’ गाणं प्रेक्षकांना भरपूर आवडलं असून विदुलाची वेगळीच छबी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आली आहे.

मैत्रीमध्ये एकमेकांना अडचणीत टाकणं असो किंवा त्याच अडचणीतून त्यांना बाहेर काढण्यासाठीची मदत असो मित्र नेहमीच तयार असतात. मैत्रीची व्याख्या नव्या अंदाजात या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, “‘बॉईज 3’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून, या चित्रपटासाठीची प्रेक्षकांची वाढती उत्सुकता पाहून खूप भारी वाटतंय. ‘बॉईज 3’च्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतलेली आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षांवर हा चित्रपट खरा उतरेल याची मला खात्री आहे.”

दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, “‘बॉईज’ आणि ‘बॉईज 2’ला मिळालेल तुफान प्रतिसाद पाहता मनोरंजनात भर म्हणून यंदा ‘बॉईज 3’ तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे. 16 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सर्व प्रेक्षक वर्गाचा प्रेम आणि आशीर्वाद राहो अशी आशा आहे.”