Daagdi Chaawl 2: ‘दगडी चाळ 2’मध्ये पुन्हा झळकणार ‘कलरफुल’ पूजा सावंत

हे सुखी कुटुंब पाहता आता सूर्याने 'डॅडीं'ची साथ सोडली की, अजूनही सूर्या 'डॅडीं'चा उजवा हात आहे? हे 'दगडी चाळ 2' पाहिल्यावरच कळेल.

Daagdi Chaawl 2: 'दगडी चाळ 2'मध्ये पुन्हा झळकणार 'कलरफुल' पूजा सावंत
Daagdi Chaawl 2: 'दगडी चाळ 2'मध्ये पुन्हा झळकणार 'कलरफुल' पूजा सावंत
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Aug 04, 2022 | 1:41 PM

‘दगडी चाळ 2’ची (Daagdi Chaawl 2) घोषणा झाल्यापासूनच सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती ती म्हणजे यात कोणते चेहरे झळकणार? हळूहळू हे चेहरे गुलदस्त्याबाहेर येऊ लागले असून आता प्रेक्षकांसमोर कलरफुल सोनल म्हणजेच अभिनेत्री पूजा सावंतची (Pooja Sawant) व्यक्तिरेखा समोर आली आहे. त्याच्यबरोबर सूर्या आणि सोनलच्या प्रेमकहाणीच्या वेलीवर आता अंशुमन नावाचं ‘बटरफ्लाय’ बसलं आहे. ‘दगडी चाळ 2’मध्ये प्रेक्षकांना सूर्या (Ankush Chaudhari) आणि सोनलचा मुलगाही पाहायला मिळणार आहे. नुकतंच त्याचं पोस्टर सोशल मीडियावर झळकलं असून एक कौटुंबिक कहाणी यात पाहायला मिळणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ 2’ येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पोस्टरमध्ये सोनल सूर्याला मिठी मारून ‘आय लव्ह यू हबी’ म्हणत आहे तर अंशुमनही सूर्याला बिलगून ‘आय लव्ह यू डॅडी’ म्हणताना दिसत आहे. हे सुखी कुटुंब पाहता आता सूर्याने ‘डॅडीं’ची साथ सोडली की, अजूनही सूर्या ‘डॅडीं’चा उजवा हात आहे? हे ‘दगडी चाळ 2’ पाहिल्यावरच कळेल. मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या व्यक्तिरेखा समोर आल्यानंतर आता उत्सुकता चित्रपटातील इतर कलाकारांविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

पोस्टर 1-

 

View this post on Instagram

 

A post shared by Daagdi Chaawl 2 (@dc2thefilm)

पोस्टर 2-

 

View this post on Instagram

 

A post shared by Daagdi Chaawl 2 (@dc2thefilm)

डॅडी आणि सूर्याचं नातं आपण याआधीच पाहिलं आहे. डॅडींच्या गुंडांसोबत होणाऱ्या भांडणानंतर सूर्या-डॅडींची होणारी मांडवली, ‘डोकॅलिटी’ वापरून काम करणारा सूर्या हा डॅडींचा उजवा हात बनला, त्यात सूर्याचा कौटुंबिक ताण, हे सगळं आपण यापूर्वी पाहिलं. आता दुसऱ्या भागात सूर्या ‘आय हेट यू डॅडी’ असं का म्हणत आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच समजू शकेल. 2015 मध्ये ‘दगळी चाळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये पूजा सावंत, अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, संजय खापरे, यतिन कार्येकर, कमलेश सावंत यांच्या भूमिका होत्या.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें