Painjan Tuz : ‘डान्सिंग गर्ल’ सलोनी सातपुते आणि ‘डीआयडी’ फेम दीपक हुलसुरे ‘पैंजण तुझं’ या कोळीगीतातून प्रेक्षकांच्या भेटीला

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 25, 2021 | 1:12 PM

'सलोनी सातपुते' आणि 'डीआयडी' फेम 'दीपक हुलसुरे' 'पैंजण तुझं' या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. (Dancing Girl' Saloni Satpute and 'DID' Fame Deepak Hulsure's new song 'Painjan Tuz')

Painjan Tuz : 'डान्सिंग गर्ल' सलोनी सातपुते आणि 'डीआयडी' फेम दीपक हुलसुरे 'पैंजण तुझं' या कोळीगीतातून प्रेक्षकांच्या भेटीला
कोळी गाणं

Follow us on

मुंबई : सध्या अनेक नवनवीन रोमँटिक गाण्यांनी (Romantic Song) प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. एकामागोमाग एक आलेल्या दिलबहार गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना बेधुंद करून सोडलं आहे. यातच भर घालत एक रोमँटिक कोळीगीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झालं आहे. ‘डान्सिंग गर्ल’ (Dancing Girl) म्हणून व्हायरल झालेली ‘सलोनी सातपुते’ आणि ‘डीआयडी’ फेम ‘दीपक हुलसुरे’ ‘पैंजण तुझं’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

‘पीबीए म्युझिक’अंतर्गत नव्या गाण्याची निर्मिती

‘पीबीए म्युझिक’अंतर्गत असलेलं हे कोळीगीत प्रेक्षकांनाही थिरकायला लावणार यांत शंकाच नाही. पीबीए म्युझिकने या आधीही ‘विठ्ठला विठ्ठला’, ‘नखरा’, ‘हे गणराया’ या गाण्यातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती यात भर घालत पीबीए म्युझिकचे ‘पैंजण तुझं’ हे नवे रोमँटिक कोळीगीतही प्रेक्षकांना ठेका धरायला लावण्यास सज्ज झाले आहे.

प्रेयसीच्या पैंजनाच्या आवाजावर प्रियकराने धरलेल्या ठेक्याचे वर्णन

प्रेयसीच्या पैंजनाच्या आवाजावर प्रियकराने नकळतपणे धरलेल्या ठेक्याचे वर्णन या पैंजण तुझं या कोळीगीतातून केले आहे. या गाण्याला अभि-राम यांनी संगीत दिले असून गाण्याचे बोल अक्षय जोशी लिखित आहेत तर हे गाणे प्रेम धीरल याने गाऊन या कोळीगीताला चारचाँदच लावले आहेत. या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा मुकुंद राऊत याने पेलवली असून क्रिएटिव्ह हेड म्हणून वैभव लोंढे याने उत्तम कामगिरी पार पाडली आहे. तर निर्माते अँजेला आणि तेजस भालेराव यांच्या पीबीए फिल्म्स अँड म्युझिक निर्मित हे गाणे कोरोना काळात डान्सिंग गर्ल म्हणून व्हायरल झालेल्या सलोनी सातपुते आणि डीआयडी फेम दीपक हुलसुरे यांच्या नृत्याने सजले आहे. कोळीगीतांची धमाल या गाण्यातून नक्की अनुभवायला मिळणार आहे याची शंकाच नाही. या गाण्यात सलोनीचा हॉट लूक पाहायला मिळणार असून चाहते तिच्या या लूकला आणि तिच्या दमदार नृत्याला नक्कीच भरभरून प्रतिसाद देतील आणि तिचा हा दमदार परफॉर्मन्स पाहणे प्रेक्षकांनाही रंजक ठरेल. या गाण्याचे चित्रीकरण पुण्यात नव्यानेच तयार झालेल्या ‘पीबीए फिल्मसिटी’ येथे पार पडले.

पाहा गाणं 

दमदार नृत्याच्या साथीने हे गाणे आज प्रेक्षकांना ठेका धरायला लावण्यास सज्ज झाले आहे. सलोनी आणि दीपकचा नृत्याविष्काराने या गाण्याची शोभा वाढविली असून हे कोळीगीत नक्कीच रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल यांत शंकाच नाही.

संबंधित बातम्या

Sunny Leone : ब्लॅक ड्रेस आणि स्टायलिश अंदाज, मुंबईत संपूर्ण कुटुंबासोबत सनी लिओनी स्पॉट

Mithila Palkar : मिथिला पालकरचा सुंदर आणि निरागस अंदाज; चाहते म्हणाले, ‘श्री कृष्णा जसे राधावर निस्वार्थ प्रेम करायचे तसं…’

Mouni Roy : मौनी रॉयने ब्लॅक ड्रेसमध्ये दाखवला बोल्ड अवतार, अ‍ॅमस्टरडॅममध्ये करतेय धमाल

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI