Darling Movie | बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचा बोलबाला, ‘पांडू’नंतर ‘डार्लिंग’लाही प्रेक्षकांची पसंती!

दुसऱ्या लॅाकडाऊननंतर सिनेमागृहांचे दरवाजे उघडल्यानंतर शुभशकून देत, प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांनंतर 'डार्लिंग' या (Darling) लव्हेबल चित्रपटालाही प्रेक्षकांचा कौल मिळाला आहे. मराठी बॅाक्स ऑफिसवर आज 'डार्लिंग'चाच बोलबाला दिसत आहे.

Darling Movie | बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचा बोलबाला, ‘पांडू’नंतर 'डार्लिंग'लाही प्रेक्षकांची पसंती!
Darling
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 1:40 PM

मुंबई : दुसऱ्या लॅाकडाऊननंतर सिनेमागृहांचे दरवाजे उघडल्यानंतर शुभशकून देत, प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांनंतर ‘डार्लिंग’ या (Darling) लव्हेबल चित्रपटालाही प्रेक्षकांचा कौल मिळाला आहे. मराठी बॅाक्स ऑफिसवर आज ‘डार्लिंग’चाच बोलबाला दिसत आहे. प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री या ‘टकाटक’ जोडीचा जलवा थिएटरमध्ये पुन्हा एकदा पहायला मिळत आहे. रसिक पुन्हा एकदा प्रथमेश-रितिका यांच्या अफलातून केमिस्ट्रीवर फिदा झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘डार्लिंग’ या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

‘अ स्ट्रेस बस्टर फॅमिली एन्टरटेनर’ ही ‘डार्लिंग’च्या पोस्टरवर देण्यात आलेली टॅगलाईन मराठी सिनेरसिकांनी खरी ठरवली आहे. ‘डार्लिंग’ मिळणाऱ्या प्रतिसादाचं संपूर्ण श्रेय चित्रपटाच्या टिमनं रसिक मायबाप यांना दिलं आहे.

गाण्यांच्या तालावर प्रेक्षक थिरकले!

लाँकडाऊनमुळं प्रेक्षकांच्या भेटीपासून दुरावलेला ‘डार्लिंग’ अखेर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनीही हा चित्रपट डोक्यावर घेतल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील काही सिनेमागृहांमध्ये ‘डार्लिंग’च्या गाण्यांवर रसिक अक्षरश: तल्लीन होऊन नाचत असल्याच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. 250हून सिनेमागृहांमध्ये 3000पेक्षा जास्त स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला ‘डार्लिंग’ पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. हडपसर, खर्डा, रहाटणी, नारायणगाव, तळेगाव, नाशिक, लातूर, नांदेड, अकलूज, अमरावती, खान्देश, चिंचवड, सोनाई, कामोठे, गोरेगाव, वाळूंज, औरंगाबाद, सिटिप्राईड अभिरूची येथे रविवारी हाऊसफुलचे बोर्ड झळकले.

प्रथमेश आणि रितिका यांच्या जोडीला निखिल चव्हाणनं साकारलेला ‘राजभाऊ’ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गावातील काही तरुणांचं प्रतिनिधीत्व करणारा असल्यानं तोदेखील लक्ष वेधून घेत आहे. टायटलवरून जरी हा चित्रपट केवळ प्रेमकथा असल्यासारखा वाटत असला, तरी मूळात हा फॅमिली एन्टरटेनर असल्यानं प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यात यशस्वी होत आहे. अखेरपर्यंत खिळवून ठेवणारं कथानक, पूर्वार्धात केलेली व्यक्तिरेखा आणि पटकथेची बांधणी, उत्तरार्धात त्याला जोडलेली इमोशनची किनार, तंत्रशुद्ध दिग्दर्शन, कलाकारांचा सशक्त अभिनय, प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी केलेलं अचूक कास्टिंग, सुमधूर संगीत, नेत्रसुखद सिनेमॅटोग्राफी आणि दर्जेदार निर्मितीमूल्ये अशी एक ना अनेक कारणं ‘डार्लिंग’ला चहू बाजूंनी परफेक्ट बनवणारी आहेत.

प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

तरुणाईसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना ताल धरायला लावण्याची क्षमता ‘डार्लिंग’च्या गाण्यांमध्ये असल्याचं चित्र महाराष्ट्रभर पहायला मिळत आहे. चित्रपटातील कलाकारांनी महाराष्ट्रातील महत्त्वाचे जिल्हे आणि शहरांमध्ये जाऊन प्रमोशन करताना केलेल्या आवाहनाला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यानं 50 टक्के आसनक्षमता असूनही अफलातून प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा :

Mouni Roy | निळ्याशार समुद्र किनारी मौनी रॉयचा जलवा, बिकिनी लूकने चाहत्यांना केलेय घायाळ!

Video | असं काय झालं की, सारा अली खानला जान्हवी कपूरसोबत टॅक्सीत बसून घरी जावे लागले?

Miss Universe 2021 | कमी वजनाचा देखील ‘भार’ झाला! ‘मिस युनिव्हर्स’ हरनाज संधूलाही करावा लागला ‘बॉडी शेमिंग’चा सामना!

Miss Universe 2021 | Harnaaz Sandhu ला मिस युनिव्हर्सचा किताब, 21 वर्षांनी भारताची उंचावली मान

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.