AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहीर साबळे यांची पणती आणि केदार शिंदेंची मुलगी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका, जाणून घ्या याबद्दल सविस्तर…

शाहिर साबळे यांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका आणि संघर्षात साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी भानुमती कृष्णकांत साबळे यांची भूमिका आता केदार शिंदे यांची मुलगी शाहीर साबळे यांची पणती सना शिंदे साकारणार आहे.

शाहीर साबळे यांची पणती आणि केदार शिंदेंची मुलगी 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका, जाणून घ्या याबद्दल सविस्तर...
| Edited By: | Updated on: Sep 03, 2022 | 1:01 PM
Share

मुंबई : शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shaheer) हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. या चित्रपटाबद्दलचे (Movie) छोटे मोठे अपडेट जाणून घेण्यासाठी नेहमीच चाहत्यांची धडपड बघायला मिळते. आता या चित्रपटासंदर्भात एक अत्यंत मोठी बातमी पुढे येत असून याची माहिती स्वत: दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी दिलीयं. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट शाहीर साबळे यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित आहे.

इथे पाहा केदार शिंदेंनी केलेली पोस्ट

केदार शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की…

महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील एका महत्वाच्या भूमिकेबद्दल केदार शिंदे यांनी सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करून माहिती दिलीयं. केदार शिंदेंच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळते आहे. केदार शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज 3 सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं…. सौ. भानुमती कृष्णराव साबळे आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती ‘सना केदार शिंदे’. पणजीच्या भूमिकेत पणती.

सना केदार शिंदे महाराष्ट्र शाहीर चित्रपटातून करणार पर्दापण

शाहीरांचा हा झंझावाती जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ सादर करताना केदार शिंदे प्रोडक्शन सोबत आता आहे. मराठी चित्रपट क्षेत्रातील महत्वाचं नाव ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट!!’ पुढच्या वर्षी 28 एप्रिल रोजी पुन्हा गर्जणार महाराष्ट्राच्या थिएटर्समध्ये अजय-अतुलचे सुमधुर संगीत!! महाराष्ट्र शाहीर 28 एप्रिल 2023 जय महाराष्ट्र…शाहिर साबळे यांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका आणि संघर्षात साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी भानुमती कृष्णकांत साबळे यांची भूमिका आता केदार शिंदे यांची मुलगी शाहीर साबळे यांची पणती सना शिंदे साकारणार आहे. याच्या माहितीची पोस्ट केदार शिंदे यांनी केलीयं. आता या चित्रपटाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.