Yuzvendra Chahal च्या बायकोचं झालं ऑपरेशन, नेमकं काय झालं होतं?

टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची (yuzvendra chahal) पत्नी धनश्री वर्मा (dhanashree verma) सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे.

Yuzvendra Chahal च्या बायकोचं झालं ऑपरेशन, नेमकं काय झालं होतं?
dhanshree-verma
Image Credit source: instagram
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 03, 2022 | 11:56 AM

मुंबई: टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची (yuzvendra chahal) पत्नी धनश्री वर्मा (dhanashree verma) सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. धनश्रीने स्वत: रुग्णालयातून फोटो शेयर करुन ही माहिती दिलीय. धनश्रीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया (Knee Surgery) झाली आहे. डान्सच्या दरम्यान धनश्री खाली पडली. त्यावेळी तिच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. धनश्रीच एक लिगामेंट तुटलं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला दिला होता.

धनश्रीने इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये काय म्हटलय?

हॉस्पिटलच्या बेडवरुन धनश्री वर्माने तिचा फोटो शेयर केला होता. “शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आयुष्यात एक झटका चांगल्या पुनरागमनाचा सेटअप असतो. आता दमदार पुनरागमन करेन. ही इश्वराचीच योजना आहे. तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थनेसाठी धन्यवाद” असं धनश्री वर्माने इन्स्टाग्राम पोस्टवरील संदेशात म्हटलं आहे.

कोणी-कोणी कमेंट केलीय?

धनश्रीच्या या पोस्टवर चहलने सुद्धा कमेंट केलीय. त्याने हार्टचा इमोजी पोस्ट केलाय. ‘लवकर बरी हो’ असं चहलने म्हटलय. त्याशिवाय भारताचा स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव, अश्विनची पत्नी प्रीती नारायण, यशस्वी जैस्वाल आणि राजस्थान रॉयल्सने सुद्धा कमेंट केलीय.

डान्स फ्लोरला तुझी आठवण येतेय

धनश्रीने लवकर बरं व्हावं, यासाठी सूर्यकुमारने प्रार्थना केलीय. राजस्थान रॉयल्सने “डान्स फ्लोरला तुझी आठवण येतेय. धमाकेदार पुनरागमन कर” असं लिहिलं आहे. धनश्रीने तिची सर्जरी कुठे झाली? त्याबद्दल माहिती दिलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

इन्स्टाग्रामवरुन चहल आडनाव हटवलं होतं

अलीकडेच धनश्रीने इन्स्टाग्रामवरुन चहल आडनाव हटवलं होतं. त्यावरुन बऱ्याच उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. धनश्री आणि युजवेंद्र चहलमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरु होत्या. त्याचवेळी धनश्रीने पोस्ट करुन दुखापत आणि नात्याबद्दल माहिती दिली. “डान्स करताना मी पडली. माझ्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली” अशी माहिती धनश्रीने 21 ऑगस्टला दिली. युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघासोबत यूएई मध्ये आहे. टीम इंडिया सध्या आशिया कप स्पर्धा खेळत आहे. धनश्रीची सर्जरी भारतात झाली की, यूएई मध्ये त्याबद्दल काही माहित नाहीय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें