मी ‘ते’ सगळं मिस करतोय, प्रशांत दामलेंनी सांगितली ‘व्यथा’

अभिनेते प्रशांत दामले यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी आपली 'व्यथा' मांडली आहे.

मी ते सगळं मिस करतोय, प्रशांत दामलेंनी सांगितली व्यथा
प्रशांत दामले
| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 12:34 PM

आयेशा सय्यद, मुंबई : अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damale) यांनी एक फेसबुक (Facebook) पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी आपली ‘व्यथा’ मांडली आहे. यात त्यांनी आपण काही गोष्टी मिस करत असल्याचं म्हटलंय. प्रशांत दामले आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “नाटक संपल्यानंतर तुमच्या बरोबर फोटो काढणं, तुमच्या बरोबर गप्पा मारणं, तुमच्या सूचना ऐकणं हे सगळंच मी मिस करतोय.. पण आपण रिस्क घेऊ शकत नाही. हा कोरोना आणि ही बंधन कधी संपत्यात असं झालंय… सगळं पूर्ववत होऊ दे बाबा लवकर.” प्रशांत दामलेंची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

प्रशांत दामलेंची फेसबुक पोस्ट

अभिनेते प्रशांत दामले यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. “नाटक संपल्यानंतर तुमच्या बरोबर फोटो काढणं, तुमच्या बरोबर गप्पा मारणं, तुमच्या सूचना ऐकणं हे सगळंच मी मिस करतोय.. पण आपण रिस्क घेऊ शकत नाही. हा कोरोना आणि ही बंधन कधी संपत्यात असं झालंय…सगळं पूर्ववत होऊ दे बाबा लवकर”, असं प्रशांत दामले यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

चाहत्याची कमेंट

त्यांच्या या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली आहे. “मी आज तुमच्या नाटकाला आलो होतो पण तुमच्या आवाहनानंतर आम्हीही नियमांचं पालन करतोय. त्याचमुळे तु्मची भेट घेणं टाळलं. आम्हीही तुम्हाला भेटणं मिस करतोय.”, अशी कमेंट केली. यावर प्रशांत दामलेंनीही कमेंट करत चाहत्याचे आभार मानलेत.

प्रशांत दामले आणि कविता लाड यांचं एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक सध्या हाऊसफुल होतंय. तसंच ३६ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रशांत दामले आणि आणि वर्षा उसगावकर एकत्र रंगमंचावर दिसणार आहेत.’सारखं काहीतरी होतंय’, हे नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने केलं आहे.

संबंधित बातम्या

आई कुठे काय करते: अरुंधतीने सोडला तिचा घरावरचा हक्क; कांचन देशमुखांवर भडकले नेटकरी

‘बाबू’चा टिझर आऊट, ‘बाबू’ शेठचा जलवा लवकरच अनुभवायला मिळणार

रश्मिकाशी लग्न करणार का? चर्चांवर अखेर विजय देवरकोंडाने सोडलं मौन