AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“नागरिक मुंबई बाहेर जातील, अतिक्रमण शहर व्यापेल अन् मग…”, सुमित राघवन संतापला

अभिनेता सुमित राघवन समाजात घडणाऱ्या अनेक बाबींवर आपली मतं मांडत असतो. नागरिकांना भेडसावणारे प्रश्न तो मांडत असतो. आताही त्याने अश्याच एका नागरी समस्येवर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अतिक्रमण हा वाढत्या शहरीकरणातील गंभीर प्रश्न आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी अतिक्रमणाची समस्या वाढताना दिसतेय. यावरच सुमित राघवन बोलता झाला आहे.

नागरिक मुंबई बाहेर जातील, अतिक्रमण शहर व्यापेल अन् मग..., सुमित राघवन संतापला
सुमित राघवन
| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 12:11 PM
Share

मुंबई : अभिनेता सुमित राघवन (Sumit Raghawan) समाजात घडणाऱ्या अनेक बाबींवर आपली मतं मांडत असतो. नागरिकांना भेडसावणारे प्रश्न तो मांडत असतो. आताही त्याने अश्याच एका नागरी समस्येवर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अतिक्रमण (Encroachment) हा वाढत्या शहरीकरणातील गंभीर प्रश्न आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी अतिक्रमणाची समस्या वाढताना दिसतेय. यावरच सुमित राघवन बोलता झाला आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे. “मेट्रो कारशेड स्थलांतरित केलं. पण दहिसर टोल नाका आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरचं बेकायदेशीर अतिक्रमण याकडे कुणाचं लक्ष नाही. ते हटवण्यासाठी काहीही केलं जात नाही. अश्याने मुंबईकर मुंबईबाहेर स्थलांतरित होतील, अतिक्रमण वाढत जाईल. आणि तुम्हीही या अतिक्रमणग्रस्त शहरात शांततापूर्ण जीवन जगू शकाल”, असं सुमित आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.

सुमित राघवनचं ट्विट

सुमित राघवन याने एक ट्विव करत अतिक्रमणावर भाष्य केलं आहे. “मेट्रो कारशेड स्थलांतरित केलं. पण दहिसर टोल नाका आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरचं बेकायदेशीर अतिक्रमण याकडे कुणाचं लक्ष नाही. ते हटवण्यासाठी काहीही केलं जात नाही. अश्याने मुंबईकर मुंबईबाहेर स्थलांतरित होतील, अतिक्रमण वाढत जाईल. आणि तुम्हीही या अतिक्रमणग्रस्त शहरात शांततापूर्ण जीवन जगू शकाल”, असं सुमित आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.

व्हीडिओतून भाष्य

सुमितने आपल्या व्हीडिओच्या माध्यमातून अतिक्रमणावर आपलं मत मांडलं आहे. “तीन दिवसापूर्वी ही दुकानं हटवण्यात आली होती. पुन्हा ही दुकानं त्याच ठिकाणी दिसत आहेत. रस्त्याच्या कडेला असं अतिक्रमण करत दुकानं थाटली जातात, त्याला परवानगी कशी मिळते?, हे मला जाणून घ्यायचं आहे. मी मुंबई महापालिकेला विनंती करतो की त्यांनी अतिक्रमणाच्या समस्येकडे लक्ष द्यावं आणि त्वरित हा प्रश्न सोडवावा”, असं म्हणत सुमित राघवनने संताप व्यक्त केला.

सुमित राघवनने नागरिकांशी संबंधित प्रश्न मांडला आहे. यावर आता मुंबई महापालिका लक्ष देणार का आणि हा प्रश्न सुटणार का?, हे पाहावं लागेल.

संबंधित बातम्या

‘लोक मला ‘कालिया’ म्हणायचे’; रेमो डिसूझाने सांगितला वर्णभेदाचा कटू अनुभव

‘आई कुठे काय करते’च्या सासू-सुनेचा धमाकेदार परफॉर्मन्स; अरुंधती-अनघाची जोरदार तयारी

कोण आहे ‘ती’ खास व्यक्ती? नेहा पेंडसेच्या प्रश्नावर संस्कृतीचा इशारा

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....