सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल शरद पवारांच्या भेटीला, गोविंदबागेतील निवासस्थानी भेट

अलका कुबल यांनी शरद पवार यांची बारामतीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यात मालिकांचे चित्रीकरण, कोरोनामुळे येणार्‍या अडचणी आणि आगामी प्रोजेक्ट संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल शरद पवारांच्या भेटीला, गोविंदबागेतील निवासस्थानी भेट
अलका कुबल यांनी बारामतीत शरद पवारांची भेट घेतली
नविद पठाण

| Edited By: अनिश बेंद्रे

Aug 09, 2021 | 7:51 AM

बारामती : सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सदिच्छा भेट घेतली. बारामतीतल्या “गोविंदबाग” या पवारांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरही उपस्थित होते. ही भेट औपचारिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

वर्षभरापूर्वी “आई माझी काळूबाई” या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान सेटवरील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. या दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री अशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यावेळी शरद पवार यांनी सेटवरील सर्व कलाकारांची आस्थेवाईकपणे चौकशी केली होती आणि भेटीचे निमंत्रण दिले होते.

कोणकोणत्या विषयांवर चर्चा?

अलका कुबल यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मालिकांचे चित्रीकरण, कोरोनामुळे येणार्‍या अडचणी आणि आगामी प्रोजेक्ट संदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे. त्यांनी सांगितले की, पवार साहेबांबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने मराठी चित्रपट सृष्टीतील निर्मात्यांनी ग्रामीण भागाकडे चित्रिकरण करावे, असा आग्रह पवार साहेबांनी व्यक्त केला आहे.

ग्रामीण भागातील लोकेशन्सचा विचार करावा, पवारांचं आवाहन

शरद पवार यांनी, पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे चित्रपट आणि मालिका निर्मात्यांनी शहरात चित्रीकरण करण्या बरोबरच ग्रामीण भागामध्ये विविध पर्यटन स्थळे आणि गावागावांमध्ये असलेल्या लोकेशनचा देखील वापर करावा त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सक्षम होण्यास मदत होईल, असे आवाहन केल्याचे कुबल यांनी सांगितले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह निर्माते-दिग्दर्शक समीर आठल्ये, ज्येष्ठ अभिनेत्री प्राजक्ता दिघे, आ. मकरंद आबा पाटील, निखील घाडगे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

अलका कुबल-प्राजक्ता गायकवाड यांच्यातला वाद उदयनराजेंच्या दरबारी

आशालता ताईंच्या जाण्याने आमची 35 वर्षांची नाळ तुटली, अलका कुबल यांना शोक अनावर

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें