AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rinku Rajguru आणि Vishal Aanand यांचा ‘आठवा रंग प्रेमाचा’ प्रदर्शनासाठी सज्ज, सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

चिरंतन टिकणाऱ्या प्रेम या संकल्पनेवर आधारित 'आठवा रंग प्रेमाचा'हा चित्रपट 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद ही फ्रेश जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Rinku Rajguru आणि Vishal Aanand यांचा 'आठवा रंग प्रेमाचा' प्रदर्शनासाठी सज्ज, सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार...
'आठवा रंग प्रेमाचा'- रिंकू राजगुरू, विशाल आनंदImage Credit source: TV9
| Updated on: Apr 06, 2022 | 12:21 PM
Share

मुंबई : चिरंतन टिकणाऱ्या प्रेम या संकल्पनेवर आधारित ‘आठवा रंग प्रेमाचा(Aathava rang premacha) हा चित्रपट 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि विशाल आनंद (Vishal Ananand) ही फ्रेश जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाची निर्मिती केली असून आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव , राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.रिंकू राजगुरू सोबत विशाल आनंद हा नव्या दमाचा अभिनेता या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

समीर कर्णिक यांनी ‘क्यु हो गया ना..’ या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर “यमला पगला दिवाना”, ‘चार दिन की चांदनी’, ‘हिरोज’, ‘नन्हे जैसलमेर’ अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर यांनी केलं आहे.

‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटात आजच्या काळातली आणि फ्रेश कथा प्रेक्षकांना पाहता येईल. प्रेमाचे अनेक रंग असतात. त्यातला आठवा रंग कोणता? याची उत्सुकता या चित्रपटाच्या पोस्टरनं निर्माण केली आहे. अतिशय रंजक असं हे पोस्टर आहे. त्यामुळे आठवा रंग प्रेमाचा प्रेक्षकांवर भूल पाडेल यात शंका नाही. चिरंतन टिकणाऱ्या प्रेम या संकल्पनेवर आधारित ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा चित्रपट 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद ही फ्रेश जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रिंकुचा सैराट हा सिनेमा विशेष गाजला. त्यानंतर तिचा मेकअप, कागर, झुंड या सिनेमांतही तिची विशेष भूमिका आहे.

संबंधित बातम्या

‘किचन कल्लाकार’च्या मंचावर राजकीय धुरळा; किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ, रुपाली ठोंबरे बनवणार पदार्थ

Viral Video : जेव्हा आलिया भट रणबीरसाठी पिझ्झा ऑर्डर करते… व्हीडिओ पाहुन तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल…

सलमान खानला दिलासा; पत्रकाराला धमकी प्रकरणी कोर्टात हजर राहण्यापासून सूट

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.