‘वन फोर थ्री’चा थिएटरमध्ये कल्ला, सलग दोन दिवस चित्रपट हाऊसफुल्ल!

प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर आणत 'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' निर्मित आणि विरकुमार शहानिर्मित 'वन फोर थ्री' हा रोमँटिक आणि खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित चित्रपट 4 मार्चपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दोन दिवसातच चित्रपटाने सिनेमागृहात चांगलीच बाजी मारली असून, मराठवाडा, औरंगाबाद, नांदेड, परभणी, नागपूर, नाशिक या भागात चित्रपट हाऊसफुल्ल झाला आहे.

'वन फोर थ्री'चा थिएटरमध्ये कल्ला, सलग दोन दिवस चित्रपट हाऊसफुल्ल!
'वन फोर थ्री' चित्रपट हाऊसफुल्ल
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 11:14 AM

मुंबई : प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर आणत ‘शारदा फिल्म्स प्रोडक्शन’ (Sharada Films Production) निर्मित आणि विरकुमार शहानिर्मित ‘वन फोर थ्री (143 Movie) हा रोमँटिक आणि खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित चित्रपट 4 मार्चपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 4 मार्चला हा चित्रपट सिनेमागृहात येताच प्रेक्षकांनी चित्रपट बघायला गर्दी केली. दाक्षिणात्य चित्रपटांचा टच असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असून भरभरून प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. दोन दिवसातच चित्रपटाने सिनेमागृहात चांगलीच बाजी मारली असून, मराठवाडा, औरंगाबाद, नांदेड, परभणी, नागपूर, नाशिक या भागात चित्रपट हाऊसफुल्ल झाला आहे. तर पुण्यातील काही भागात चित्रपटाने हाऊसफुल्ल होत चांगलाच गल्ला केला आहे. प्रेक्षकही चित्रपटाचे भरभरून कौतुक करताना पाहायला मिळत आहेत, शिवाय चित्रपटातील गाण्यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.

दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित या प्रेमाचे विविध रंग उधळणाऱ्या चित्रपटात अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तर अभिनेता वृषभ शहाचा खलनायकी जबरा असा रूप प्रेक्षकांसमोर आला. याशिवाय या चित्रपटात सुरेश विश्वकर्मा आणि शशांक शेंडे यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.

‘वन फोर थ्री’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. तर लखन चौधरी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. आपल्या सर्वांची लाडकी अशी सुमधुर गायिका आर्या आंबेकर हिने भरली मना मध्ये हे चित्रपटातील गाणे सुमधूर आवाजात रेकॅार्ड केले आले. तर चित्रपटातील ‘वाचू दे इष्काचा प्राण’ ही कव्वाली प्रमोद त्रिपाठी यांनी गायली असून आयटम सॉंग ‘पडला खटका’ रेश्मा सोनावणे हिने शब्दबद्ध केले आहे. तर सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी त्यांच्या दमदार आवाजात ‘धिंगाणा’ पार्टी सॉंग गायले आहे. नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे.

विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाकरिता काम केले आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे. ‘हे आपलं काळीज हाय’ या ‘वन फोर थ्री’ चित्रपटाच्या टॅगलाईनने सिनेमागृहात धुमाकूळ घातला असून प्रेक्षकही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहेत.’वन फोर थ्री’ चित्रपटाची कथा रिअल लाईफ स्टोरीवर आधारित असून यांत एकमेकांवर जीव जडलेल्या प्रेयसी आणि प्रियकराची कथा पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

हा क्यूट फोटो आहे मराठीतील टॉप अभिनेत्रीचा, कोण आहे ओळखलं का?

जान्हवी कपूरच्या मोडक्या-तोडक्या हिंदीची आई श्रीदेवीकडूनच कॉपी, अन् एकच हश्या, वाचा पूर्ण किस्सा…

Majhi Tujhi Reshim Gath : यश आणि नेहाची ‘ओम शांती ओम’ स्टाईल डेट, यश-नेहा प्रेमरंगी रंगले…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.