Most Followed Marathi Star: सई, प्रिया, प्राजक्ता नव्हे तर ‘या’ मराठी अभिनेत्रीचे सर्वाधिक Instagram फॉलोअर्स

नुकतंच या ॲपवर एका मराठी अभिनेत्रीने 25 लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. या अभिनेत्रीने मराठी कलाकारांमध्ये (Marathi star) एक विक्रमच रचला आहे. विशेष म्हणजे सई ताम्हणकर, प्रिया बापट, प्राजक्ता माळी यांसारख्या अभिनेत्रींनाही तिने मागे टाकलं आहे.

Most Followed Marathi Star: सई, प्रिया, प्राजक्ता नव्हे तर या मराठी अभिनेत्रीचे सर्वाधिक Instagram फॉलोअर्स
Marathi Stars
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 13, 2022 | 11:21 AM

इन्स्टाग्राम (Instagram) हे सध्या सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचं आवडतं ॲप ठरलं आहे. या फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग ॲपवर असंख्य सेलिब्रिटी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या अधिक असली की त्या सेलिब्रिटीला चाहत्यांमध्ये लोकप्रिय मानलं जातं. अनेक मराठी कलाकारसुद्धा या ॲपवर सक्रिय आहेत. नुकतंच या ॲपवर एका मराठी अभिनेत्रीने 25 लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. या अभिनेत्रीने मराठी कलाकारांमध्ये (Marathi star) एक विक्रमच रचला आहे. विशेष म्हणजे सई ताम्हणकर, प्रिया बापट, प्राजक्ता माळी यांसारख्या अभिनेत्रींनाही तिने मागे टाकलं आहे. ही अभिनेत्री आहे नुकतीच लग्नबंधनात अडकलेली हृता दुर्गुळे (Hruta Durgule). ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेत ती सुद्धा दीपूची भूमिका साकारतेय.

हृताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले. ‘माझ्या प्रत्येक गोष्टीत साथ देणाऱ्या, मला पाठिंबा देणाऱ्या 25 लाख फॉलोअर्सचे आभार. मी कृतज्ञ आहे’, असं तिने लिहिलं. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या पहिल्या ‘दुहेरी’ या मालिकेपासून आताच्या ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेपर्यंतचा प्रवास मांडला आहे. यामध्ये तिने तिच्या आगामी ‘अनन्या’ आणि ‘टाइमपास 3’ या चित्रपटांचीही झलक दाखवली आहे.

पहा व्हिडीओ-

हृताने ‘दुर्वा’, ‘फुलपाखरू’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेलाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. नुकतीच तिने दिग्दर्शक प्रतीक शाहशी लग्नगाठ बांधली. तिचा ‘टाइमपास 3’ हा बहुचर्चित चित्रपटसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इन्स्टाग्रामवर हृता बऱ्यापैकी सक्रिय असून तिचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या लग्नाच्या फोटोंवरही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला होता.