सामाजिक रूढींची परिसीमा ओलांडणारा ‘रिवणावायली’, ‘8 एप्रिल’पासून जवळच्या चित्रपटगृहात

रिवण म्हणजे वर्तुळ आणि वायली म्हणजे वेगळं; एका वर्तुळात आयुष्य न जगता त्याच्यापासून वेगळं होऊन जगणाऱ्या एका स्त्रीची गाथा रिवणावायली मांडते. 'बिटरस्वीट' या चित्रपटासाठी अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात पारितोषिक विजेती अक्षया गुरव ही अभिनेत्री या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

सामाजिक रूढींची परिसीमा ओलांडणारा 'रिवणावायली', ‘8 एप्रिल’पासून जवळच्या चित्रपटगृहात
'रिवणावायली' - सिनेमा
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 4:22 PM

मुंबई : समाज कितीही पुढारलेला असला तरी त्याची स्त्री प्रतीची भावना मात्र सारखीच आहे. पुरोगामी होत असताना आधुनिक जगतात वावरत असताना स्त्री ला तिच्या हक्कासाठी तिच्या स्वातंत्र्यासाठी लढावं लागत. असाच एक लढा आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे ‘रिवणावायली(Rivnavayli movie). या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार (Sanjay pawar) यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. संगीत पार्थ उमराणी (Parth Umrani) यांचे असून गीत वैभव देशमुख (Vaibhav deshmukh) यांनी लिहिले आहेत. चित्रपटात अक्षया सोबत शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, आकाश नलावडे, संतोष राजेमहाडिक, प्रताप सोनाली आणि कल्याणी चौधरी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

रिवण म्हणजे वर्तुळ आणि वायली म्हणजे वेगळं; एका वर्तुळात आयुष्य न जगता त्याच्यापासून वेगळं होऊन जगणाऱ्या एका स्त्रीची गाथा रिवणावायली मांडते. ‘बिटरस्वीट’ या चित्रपटासाठी अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात पारितोषिक विजेती अक्षया गुरव ही अभिनेत्री या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

उच्च शिक्षण घेऊन आपलं स्वतःच जगात एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी जटणाऱ्या ‘ऐश्वर्या देसाई’ या बंडखोर मुलीची ही कथा आहे येत्या ८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जुन्या रूढी परंपरा आणि लग्नाच्या बेडीत स्त्रिया अडकून जातात, अनेकदा इच्छा असून सुद्धा त्यांना त्यांच्या इच्छेनुसार वागता येत नाही.हे सगळं घडत असतानाच अनेकदा आपल्या आयुष्यभराचा सोबती असलेला आपला जोडीदाराकडून स्वतःची होणारी मुस्कटदाबी ही स्त्रीच्या अंतःकरणातला आक्रोश बाहेर आणते. याचंच बंडखोर चित्रण या ‘रिवणावायली’ मध्ये चित्रित करण्यात आलं आहे.

या सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक डॉ. दिनेश कदम असून छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. संगीत पार्थ उमराणी यांचे असून गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत. चित्रपटात अक्षया सोबत शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, आकाश नलावडे, संतोष राजेमहाडिक, प्रताप सोनाली आणि कल्याणी चौधरी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

संबंधित बातम्या

द काश्मीर फाईलची चर्चा सुरूच, नाना पाटेकर म्हणतात गट पडणं साहजिक पण…

“तिच्याशी ब्रेकअपनंतर मी बर्बाद झालो”; प्रतीक बब्बरने सांगितला Amy Jacksonसोबतचा कटू अनुभव

The Kashmir Files बॉक्स ऑफिसवर सुसाट; 100 कोटींपासून काही पावलं दूर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.