Santosh Juvekar: ‘गोव्याच्या ट्रिपला सहज 20-25 हजार रुपये खर्च करता मग..’, संतोष जुवेकरच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव

संतोषच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. तर काहींनी त्याचं कौतुक केलं. 'संतोष दादा तुमचा वेगळेपणाच खूप भावतो मनाला,' असं एकाने लिहिलं.

Santosh Juvekar: 'गोव्याच्या ट्रिपला सहज 20-25 हजार रुपये खर्च करता मग..', संतोष जुवेकरच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव
Santosh JuvekarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 3:19 PM

सोशल मीडिया (Social Media) हे व्यक्त होण्याचं प्रभावी माध्यम बनलं आहे. या माध्यमाचा योग्य उपयोग केल्यास, त्यातून बऱ्याच काही गोष्टी साध्य होतात. याचीच प्रचिती अभिनेता संतोष जुवेकरच्या (Santosh Juvekar) इन्स्टा पोस्टवरून आली. संतोषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली असून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गरजूंना मदत करण्यासंदर्भातली ही पोस्ट जरी असली तरी संतोषने ज्या पद्धतीने नेटकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, ती अनेकांना आवडली. हॉटेलमध्ये जेवायला किंवा गोवा ट्रिपला (Goa Trip) आपण हजारो रुपये खर्च करतो. पण हेच पैसे आपण एखाद्या चांगल्या कामासाठी वापरले, तर एखाद्याचं आयुष्य त्यातून घडू शकतं. याचसंदर्भात माहिती देणारी संतोषची ही पोस्ट आहे. त्याची ही पोस्ट वाचून अनेकांनी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

संतोष जुवेकरची पोस्ट-

‘घरच्यांबरोबर, मित्र मैत्रिणींबरोबर बाहेर कधी नुसतं जेवायला गेलो तरी सहा-सात हजार रुपये बिल सहज येतं. मग जर फक्त दहा हजारांत आपण एखाद्या मुलाचं/मुलीचं वर्षाचं अन्न नक्कीच पुरवू शकतो. वर्षातून एखादी गोव्याची ट्रिप केली तरी 20-25 हजार सहज खर्च होतात आपले. मग फक्त 15 हजारांत एखाद्या मुलाचा/मुलीचा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च नक्कीच करून त्या मुलाचे/मुलीचे दत्तक पालकत्व स्वीकारू शकतो आपण. आणि हे सगळं ज्यांना मनापासून करावंसं वाटतं आणि जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि ज्यांना कुठलीही अडचण नाही त्यांनी नक्कीच करावं. पण मदत म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून आणि ही बळजबरी नाही,’ अशी पोस्ट त्याने लिहिली आहे. त्यासोबतच संस्थेचा संपर्क क्रमांक आणि इतर माहिती देणारा एक फोटो पोस्ट केला आहे.

हे सुद्धा वाचा

मदतीबद्दलची माहिती-

संतोषच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. तर काहींनी त्याचं कौतुक केलं. ‘संतोष दादा तुमचा वेगळेपणाच खूप भावतो मनाला,’ असं एकाने लिहिलं. तर ‘दादा तू म्हणतो ते बरोबर आहे. एखादी पार्टी किंवा एखादा वायफळ खर्च कॅन्सल करुन आपण एका विद्यार्थ्याचे भविष्य उज्ज्वल करु शकतो,’ असं दुसऱ्याने म्हटलं. ‘मला आवडेल इथे मदत करायला आणि जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी समाजासाठी हातभार लावण्यास कचरू नये,’ असंही एका युजरने लिहिलं.

Non Stop LIVE Update
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.