शशांक केतकर बनला ‘बाप’माणूस, इन्स्टाग्रामवरून दिली चाहत्यांना गुड न्यूज

'होणार सून...'मधल्या श्री या व्यक्तिरेखेमुळे तुफान लोकप्रियता मिळालेल्या अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) बाबा झाला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:43 AM, 21 Feb 2021
शशांक केतकर बनला 'बाप'माणूस, इन्स्टाग्रामवरून दिली चाहत्यांना गुड न्यूज

मुंबई : ‘होणार सून…’मधल्या श्री या व्यक्तिरेखेमुळे तुफान लोकप्रियता मिळालेल्या अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) बाबा झाला आहे. नुकताच त्याने ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली असून सर्वांना आनंदाचा धक्काच दिला आहे. शशांकने त्याच्या इंस्टाग्रामवर बाळाच्या आणि त्याचा एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये शंशाक खूप आनंदी दिसत आहे. (Shashank Ketkar became the father by posting good news to the fans on Instagram)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

मात्र, शंशाकने आपल्या बाळाचा चेहरा चाहत्यांना दिसू दिला नाही. हा फोटो शेअर करताना शंशाकने लिहिले आहे की, ऋग्वेद शशांक केतकर म्हणजे शंशाकला मुलगा झाला आहे.
मराठी कलाविश्वातील चॉकलेट बॉय म्हणून अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झालेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेच्या माध्यमातून शशांक घराघरात पोहोचला आणि तुफान लोकप्रिय झाला. या मालिकेतील त्याची श्री ही भूमिका कोणीही विसरणं शक्य नाही. परंतु, या मालिकेनंतर त्याचा छोट्या पडद्यावरील वावर कमी झाला आहे.

संबंधित बातम्या : 

यंदा मराठी चित्रपटांची खास मेजवाणी; दहा पेक्षाही अधिक चित्रपट होणार रिलीज!

Marathi Movie : अखेर ‘हरिओम’वरील पडदा उठला, हरिओम घाडगे, गौरव कदम साकारणार प्रमुख भूमिका

Video : ‘पाळणा बाळ शिवाजीचा’, पाहा शालूचा मराठमोळा अवतार

(Shashank Ketkar became the father by posting good news to the fans on Instagram)