AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मिता तांबे आव्हानात्मक भूमिकेत; पश्चिम महाराष्ट्रातल्या गावात झालं चित्रीकरण

नवनवीन भूमिकांसाठी सतत आग्रही असणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe). चित्रपट, मालिका, वेब सीरीज या माध्यमांतून वेगवेगळ्या भूमिका करत आपल्या अभिनयाच्या छटा दाखवणारी स्मिता आगामी ‘लगन’ (Lagan) या मराठी चित्रपटात (Marathi Movie) आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे.

स्मिता तांबे आव्हानात्मक भूमिकेत; पश्चिम महाराष्ट्रातल्या गावात झालं चित्रीकरण
Smita TambeImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Apr 19, 2022 | 7:45 AM
Share

नवनवीन भूमिकांसाठी सतत आग्रही असणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe). चित्रपट, मालिका, वेब सीरीज या माध्यमांतून वेगवेगळ्या भूमिका करत आपल्या अभिनयाच्या छटा दाखवणारी स्मिता आगामी ‘लगन’ (Lagan) या मराठी चित्रपटात (Marathi Movie) आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे. जी. बी. एंटरटेंन्मेंट निर्मित आणि अर्जुन गुजर दिग्दर्शित ‘लगन’ हा चित्रपट 6 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राधा असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. खेडयात राहणारी ऊसतोडणी कामगाराची भूमिका स्मिताने यात साकारली आहे. करारी, कणखर तरीही सोज्वळ अशा छटा या व्यक्तिरेखेला आहेत. स्मिताचा खेडवळ लूक यामध्ये दिसणार आहे. या व्यक्तिरेखेसाठी स्मिताने स्वत: बैलगाडी चालवली आहे. ऊसाच्या भल्यामोठया मोळया डोक्यावर घेत उन्हातान्हात शूटिंग केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या गावांतून चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

‘हे पात्र साकारणं माझ्यासाठी आनंददायी आणि तेवढंच आव्हानात्मक होतं. मुळात प्रत्येक स्त्री मध्ये खूप माया दडलेली असते. आपल्या लेकरासाठी काहीही करण्याची प्रत्येक आईची धडपड असते. हे पात्र साकारताना, प्रत्येक आईची ती तळमळ दाखवणं, एवढंच मी या माझ्या भूमिकेतून केलं आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने गावातील जीवनपद्धती पुन्हा एकदा जवळून बघता आली याचा ही आनंद आहे’, अशा शब्दांत स्मिताने तिचा अनुभव सांगितला.

‘लगन’ चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केलं आहे. चित्रपटाचे छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे असून अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. पार्श्वसंगीत पी. शंकरम तर साऊंड डिझायन विकास खंदारे यांचे आहे. प्रेम माणसाला स्वत:च्या पलीकडे पहायची शक्ती देतं. प्रेमात पडणं जेवढं आनंददायी असतं तितकंच समर्थपणे प्रेम निभावणं अवघड असतं, प्रेमामुळंच नाती जोडली आणि तोडलीही जातात. अडचणींवर मात करत प्रेमाची साथ निभावणार्‍या अनोख्या प्रेमाची गोष्ट ‘लगन’ चित्रपटात 6 मे रोजी पहायला मिळणार आहे.

हेही वाचा:

बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत शाहरुख-सलमानचा खास अंदाज; पहा PHOTO

Ranbir Alia Wedding Gifts: करीनाकडून डायमंड नेकलेस तर नीतू कपूर यांच्याकडून 6BHK फ्लॅट; रणबीर-आलियाला मिळाले ‘हे’ महागडे गिफ्ट्स

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....