AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत शाहरुख-सलमानचा खास अंदाज; पहा PHOTO

रमजानमध्ये सेलिब्रिटींसाठी मोठ्या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यासाठी बाबा सिद्दिकी (Baba Siddique) ओळखले जातात. या इफ्तार पार्टीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठमोठे कलाकार हजेरी लावतात. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे गेल्या दोन वर्षांपासून त्यांना या पार्टीचं आयोजन करता आलं नव्हतं.

बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत शाहरुख-सलमानचा खास अंदाज; पहा PHOTO
Salman Khan and Shah Rukh KhanImage Credit source: Instagram/ Yogen Shah
| Updated on: Apr 18, 2022 | 3:32 PM
Share

रमजानमध्ये सेलिब्रिटींसाठी मोठ्या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यासाठी बाबा सिद्दिकी (Baba Siddique) ओळखले जातात. या इफ्तार पार्टीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठमोठे कलाकार हजेरी लावतात. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे गेल्या दोन वर्षांपासून त्यांना या पार्टीचं आयोजन करता आलं नव्हतं. मात्र यंदा रमजानमध्ये त्यांनी रविवारी (17 एप्रिल) या इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खानसह (Salman Khan) अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुख आणि सलमान हे बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीचं खास आकर्षण असतात. या दोघांनी बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीतच एकमेकांना मिठी मारत वैर मिटवल्याचं म्हटलं जातं. दरवर्षी या पार्टीची जोरदार चर्चा होते. यावर्षी देखील सलमान आणि शाहरुखने विशेष लक्ष वेधून घेतलं.

यावेळी सलमानने काळा शर्ट आणि डेनिम पँट अशा पोशाखात हजेरी लावली होती. सलमानसोबत सलिम खान, सोहैल, अरबाज, अलविरा आणि तिचा पती अतुल अग्निहोत्री हे सुद्धा या पार्टीला पोहोचले होते. यावेळी शाहरुखच्या पेहरावाने मात्र सर्वांचं लक्ष वेधलं. किंग खानने यावेळी काळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. मिस युनिव्हर्स 2021 हरनाज सिंधूनेही इफ्तार पार्टीत हजेरी लावली. या पार्टीतील सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पहा फोटो आणि व्हिडीओ-

दायक मिका सिंग, कॉमेडियन कृष्णा अभिषेक, त्याची पत्नी कश्मीरा शाह आणि बहीण आरती सिंह, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, संजय दत्त, शहनाज गिल यांनीसुद्धा पार्टीला हजेरी लावली. धर्माचं कारण देत बॉलिवूडला रामराम करणारी सना खानसुद्धा या इफ्तार पार्टीला उपस्थित होती. पती अनस सईदसोबत ती या पार्टीला आली होती.

17 एप्रिल रोजी मुंबईतील ताज लँड्स एंड याठिकाणी या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. “कोरोनामुळे मी गेली दोन वर्षे इफ्तार पार्टीचं आयोजन केलं नव्हतं. इफ्तारला माझ्या मित्रांना भेटणं आणि सर्वांनी एकत्र भोजनाचा आनंद लुटणं.. या गोष्टी मी खूप मिस केल्या. मात्र आता पुन्हा एकदा मला ही संधी मिळाली आहे”, अशी प्रतिक्रिया बाबा सिद्दिकीने दिली होती.

हेही वाचा:

Ranbir Alia Wedding Gifts: करीनाकडून डायमंड नेकलेस तर नीतू कपूर यांच्याकडून 6BHK फ्लॅट; रणबीर-आलियाला मिळाले ‘हे’ महागडे गिफ्ट्स

KGF 2 Box Office Collection : खान-बिन विसरा सगळे, केजीएफचा ‘यश’ सगळ्यांवर भारी, फास्टेस्ट 200 कोटींची कमाई

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.