Phulrani | दिवाळीत दरवळणार ‘फुलराणी’चा गंध, सुबोध भावे दिसणार रोमँटिक भूमिकेत!

Phulrani | दिवाळीत दरवळणार 'फुलराणी'चा गंध, सुबोध भावे दिसणार रोमँटिक भूमिकेत!
Phulrani

'पिग्मॅलिअन' वर आधारित 'माय फेअर लेडी' हा संगीतमय चित्रपट जगभर खूप गाजला होता. त्याच कलाकृतीने प्रेरित होऊन 'फुलराणी....अविस्मरणीय प्रेमकहाणी' (Phulrani) हा मराठी चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन विश्वास जोशी करत असून चित्रपटातून एक अनोखी फुलराणी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jan 03, 2022 | 2:26 PM

मुंबई : ‘पिग्मॅलिअन’ वर आधारित ‘माय फेअर लेडी’ हा संगीतमय चित्रपट जगभर खूप गाजला होता. त्याच कलाकृतीने प्रेरित होऊन ‘फुलराणी….अविस्मरणीय प्रेमकहाणी’ (Phulrani) हा मराठी चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन विश्वास जोशी करत असून चित्रपटातून एक अनोखी फुलराणी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी नाटकातील फुलराणीवर प्रचंड प्रेम केलं.

परंतु, चित्रपटातील फुलराणी कशी असणार? कोण असणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता पहायला मिळतेय. येत्या दिवाळीत या ‘फुलराणी’ चा गंध महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत दरवळणार आहे. त्यासाठीच निर्मात्यांनी नववर्षारंभीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे.

सुबोध भावे दिसणार रोमँटिक भूमिकेत!

तिकीटबारीवर यशस्वी ठरलेल्या ‘नटसम्राट’, ‘What’s up लग्न’ या चित्रपटांनंतर विश्वास जोशी यांच्या ‘फुलराणी’ कडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा असणार आहेत. सर्वस्वी नव्या स्वरूपातील ‘फुलराणी’ प्रेक्षकांना या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. यातील ‘विक्रम राजाध्यक्ष’ ही मुख्य भूमिका प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) साकारणार आहेत. चित्रपटातील इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात असली तरी प्रेमाचा अविस्मरणीय अविष्कार या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना बघायला मिळेल, असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी व्यक्त करतात.

कोरोना काळात पूर्ण केले चित्रीकरण

जवळपास गेले दोन वर्ष संपूर्ण जग आणि विश्व देखील कोरोनामुळे ठप्प झालं होतं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सगळ्यावरच अनेक कठोर निर्बंध लादण्यात आले होते. अखेर काहीसा कहर कमी होताच आर्थिक चक्र सुरळीत होऊन जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी काही निर्बंध हटवत आवश्यक कामांना परवानगी देण्यात आली. याच दरम्यान चित्रपटसृष्टीतील अडकलेली चक्र पुन्हा सुरु झाली आणि चित्रीकरणाने देखील वेग पकडला. याच जोखमीच्या काळात संपूर्ण काळजी घेत सुबोध भावे यांच्या ‘फुलराणी’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले होते.

इंग्रजी कलाकृतीवर आधारित चित्रपट

सुबोध भावे अभिनीत विश्वास जोशी दिग्दर्शित चित्रपट ‘फुलराणी… अविस्मरणीय प्रेमकहाणी’ हा प्रसिद्ध लेखक जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या ‘पिग्मॅलिअन’ या कलाकृतीने प्रेरित आहे. या चित्रपटाला प्रियंका बर्वे, आनंदी जोशी, शरयू दाते, निलेश मोहरीर, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, हृषीकेश रानडे अशी गायक आणि संगीतकरांची तगडी फौज लाभली आहे. तर, गीतकार गुरु ठाकूर यांनी चित्रपटातील गीतांचे बोल लिहिले आहेत.

‘फिनक्राफ्ट मिडिया प्रोडक्शन’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून चित्रपटाची निर्मीती जाई विश्वास जोशी आणि अमृता अरुण राव यांनी केली आहे. या नव्या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. छायांकन केदार गायकवाड तर कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे. सहाय्यक दिग्दर्शक उत्कर्ष जाधव आहेत, रंगभूषा संतोष गायके तर वेशभूषा सायली सोमण यांनी केली आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. मिलिंद शिंगटे आणि आनंद गायकवाड चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

हेही वाचा :

स्वप्नील जोशीने नवीन वर्षातील नवीन चित्रपटाची केली घोषणा, ‘अश्वत्थ’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियादेखील कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!

Khatija | वाढदिवशीच खातिजा अडकली खास नात्यात!, पाहा कोण आहे ए आर रहमानचा होणारा जावई Riyasdeen?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें