AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashi Hi Banwa Banwi: ‘अशी ही बनवाबनवी’मध्ये चुकून म्हटलेला ‘हा’ डायलॉग गाजला सर्वाधिक

अशोक सराफ यांनी सांगितला त्या डायलॉगमागचा मजेशीर किस्सा

Ashi Hi Banwa Banwi: 'अशी ही बनवाबनवी'मध्ये चुकून म्हटलेला 'हा' डायलॉग गाजला सर्वाधिक
Ashi hi Banwa BanwiImage Credit source: Facebook
| Edited By: | Updated on: Sep 23, 2022 | 12:54 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात तुफान गाजलेला आणि कायम लोकप्रिय ठरलेला चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’ (Ashi Hi Banwa Banwi). या चित्रपटाला आज 34 वर्षे पूर्ण झाली आहेत. यातील प्रत्येक डायलॉग, गाणी ही प्रेक्षकांच्या अगदी तोंडपाठ असतील. काळ सरला तरी या चित्रपटाचा चाहतावर्ग कधीच कमी होणार नाही. यातील प्रत्येक पात्राने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यातील संवाद ऐकून आजही चेहऱ्यावर हसू येतं. या चित्रपटाचे किस्सेही तितकेच मजेशीर आहेत. असाच किस्सा अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. सेटवर त्यांनी चुकून म्हटलेला एक डायलॉग तुफान हिट ठरला.

राहायला घर मिळावं यासाठी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर हे दोघं स्त्री वेशांतर करतात. स्त्री वेशांतर केल्यावर लक्ष्मीकांत  बेर्डे हे पडद्यावर अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका साकारतात.

घरमालकीणीला पत्नीची ओळख करून देताना अशोक सराफ हे चुकून ‘हा माझा बायको पार्वती’ असं म्हणतात. हा डायलॉग डोळ्यांसमोर आला तर आजही प्रेक्षक पोट धरून हसतात. पण तुम्हाला माहितीये का, अशोक मामांनी म्हटलेला हा डायलॉग खरंतर लिहिलेला नव्हता.

पडद्यामागे अशोक मामा हे लक्ष्मीकांत यांच्याशी ज्याप्रकारे बोलतात, त्याच ओघात डायलॉग बोलताना ते पटकन ‘हा माझा बायको पार्वती’ असं म्हणून जातात. दिग्दर्शकांनीही तो संवाद बदलला नाही आणि पुढे जाऊन तोच संवाद तुफान गाजला.

‘लिंबूचं मटण’, ‘धनंजय माने इथेच राहतात का?’, ’70 रुपये वारले’ असे या चित्रपटातील अनेक संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. काही चित्रपट वारंवार पाहिले तरी त्यातली मजा कधीच कमी होत नाही, असाच काहीसा अनुभव ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपट पाहताना येतो.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.