AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदिनाथ कोठारे साकारणार ‘तो’ ध्येयधुरंदर राजकारणी, ‘चंद्रमुखी’तील दौलत देशमानेचा चेहरा अखेर समोर

'चंद्रमुखी' सिनेमातील ध्येयधुरंदर राजकारणी 'दौलत देशमाने' या दमदार भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. याचा टीझर लॉन्च झाला आहे.

आदिनाथ कोठारे साकारणार 'तो' ध्येयधुरंदर राजकारणी, 'चंद्रमुखी'तील दौलत देशमानेचा चेहरा अखेर समोर
आदिनाथ कोठारे- 'चंद्रमुखी' चित्रपटImage Credit source: TV9
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Mar 16, 2022 | 1:24 PM
Share

मुंबई : विश्वास पाटील (Vishas Patil) यांच्या ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचा टिझर काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर झळकला. खरंतर घोषणेपासूनच हा चित्रपट अनेकांसाठी चर्चेचा विषय होता आणि टिझरनंतर या चर्चांना अधिकच उधाण आले. त्यात टिझरमध्ये कोणत्याच कलाकाराचा चेहरा समोर न आल्याने ही उत्सुकता अधिकच वाढली. टिझरमध्ये पिळदार शरीरयष्टी असणारा पाठमोरा ‘तो’ ध्येयधुरंदर राजकारणी दिसत आहे. हा चेहरा कोण असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. अखेर या प्रश्नाला पूर्णविराम देत ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आली आहे. महाराष्ट्रातील एक असा नेता जो समाजाच्या हितासाठी, प्रत्येकाला मदत करण्यासाठी तत्पर असणारा, महाराष्ट्राची लोककला जपणारा, त्यांचे हक्क मिळवून देणारा आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी धडपडणारा ‘दौलत देशमाने‘ (Daulat Deshmane) आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) दिसणार आहे.

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन्स प्रस्तुत, फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. तर या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.

आदिनाथ कोठारे भूमिकेबद्दल म्हणतो, ”निर्मिती, दिग्दर्शन, बॉलिवूड चित्रपट केल्यानंतर आता बऱ्याच काळाने आपल्या भाषेत अभिनय करत आहे आणि त्यातही इतकी दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळतेय, त्यामुळे यापेक्षा वेगळा आनंद कोणता असूच शकत नाही. भूमिकेबद्दल सांगायचे तर यापूर्वीही मी राजकारण्याची भूमिका साकारली आहे. मात्र ही भूमिका खूप वेगळी आहे. एक असा राजकारणी ज्याची आयुष्यात काही ध्येय आहेत. तो समाजकल्याणासाठी, हक्कांसाठी लढत, धडपडत आहे. त्याच्या या धडपडीला यश मिळेल का, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. ”

दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, ”यापूर्वी मी आदिनाथचे काम पाहिले आहे. त्यामुळे दौलतच्या व्यक्तिरेखेत तो चपखल बसला. त्याने त्याच्या भूमिकेला शंभर टक्के न्याय दिला आहे. टिझरमध्येच आपल्याला दौलतच्या व्यक्तिरेखेचा अंदाज आला आहे. त्यामुळे पडद्यावर दौलत काय करणार आहे, हे प्रेक्षकांना कळेलच. आता ‘चंद्रमुखी’ समोर यायची आहे. तीही लवकरच आपल्या भेटीला येईल.”

प्लॅनेट मराठी’चे संस्थापक, प्रमुख अक्षय बर्दापूरकर ‘चंद्रमुखी’विषयी म्हणतात, ”आतापर्यंत ‘प्लॅनेट मराठी’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. म्हणूनच त्यांच्यासाठी आम्ही ‘चंद्रमुखी’सारखा भव्य चित्रपट घेऊन येत आहोत. इतर कोणत्याही माध्यमावर हा चित्रपट प्रदर्शित न करता केवळ चित्रपटगृहातच या चित्रपटाची भव्यता प्रेक्षकांनी अनुभवावी, असा आमचा अट्टाहास असल्याने आम्ही इतका काळ प्रतीक्षा केली. पन्नास टक्के आसन क्षमता असतानाही हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे टाळले. आता शंभर टक्के आसन क्षमता असल्याने प्रदर्शनाची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे लवकरच ‘चंद्रमुखी’ आपल्या भेटीला येणार आहे. यात प्रेक्षकांना राजकारण आणि त्याभोवती फिरणारी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथाही एकदम दमदार आहे. आम्हाला आनंद आहे की, असे चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत.”

संबंधित बातम्या

The Kashmir Files Movie : रितेश देशमुखकडून अनुपम खेर आणि ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाला शुभेच्छा, म्हणाला…

थिएटरचा AC बंद पडला की मॅनेजरनं जाणीवपुर्वक ‘द काश्मीर फाईल्स’ बंद केला? नोएडात सिनेमा बघता बघता हिंदू-मुस्लिम वाद

The Kashmir Files: काश्मीरमधून पंडीतांनी पलायन केलं त्यावेळेस केंद्रात कुणाचं सरकार होतं? काँग्रेस नेते म्हणतात, भाजपला विचारा

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट