AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kashmir Files Movie : रितेश देशमुखकडून अनुपम खेर आणि ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाला शुभेच्छा, म्हणाला…

अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करत 'द काश्मीर फाईल्स' या सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने या ट्विटमध्ये अनुपम खेर आणि विवेक अग्नीहोत्री यांना टॅग करत शुभेच्छा दिल्या आहेत.

The Kashmir Files Movie : रितेश देशमुखकडून अनुपम खेर आणि 'द काश्मीर फाईल्स' सिनेमाला शुभेच्छा, म्हणाला...
रितेश देशमुख,'द काश्मीर फाईल्स'- सिनेमाImage Credit source: TV9
| Updated on: Mar 16, 2022 | 1:08 PM
Share

मुंबई : बॉलिवूडमधला मराठमोळा चेहरा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपलं मत मांडताना दिसतो. सध्या ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमावर रितेशने आपलं मत मांडलं आहे. त्याने अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) आणि ‘द काश्मीर फाईल्स’ च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. “हा सिनेमा सर्व विक्रम मोडत आहे. ही कौतुकाची वेळ आहे. या सिनेमातील सर्व कलाकारांचं आणि दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री (Vivek Agnihotri) यांचं मी अभिनंदन करतो. चित्रपटाच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो”, असं रितेश म्हणाला आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहे. एकीकडे या सिनेमावर काँग्रेसमधले काही नेते टीका करत असताना दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेशने त्याचं मत ठामपणे मांडलं आहे.

रितेशचं ट्विट

अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करत ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. “हा सिनेमा सर्व विक्रम मोडत आहे. ही कौतुकाची वेळ आहे. या सिनेमातील सर्व कलाकारांचं आणि दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांचं मी अभिनंदन करतो. चित्रपटाच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो”, असं रितेश म्हणाला आहे. त्याने या ट्विटमध्ये अनुपम खेर आणि विवेक अग्नीहोत्री यांना टॅग करत शुभेच्छा दिल्या आहेत.

कंगनाकडून ‘द काश्मीर फाईल्स’चं कौतुक

अभिनेत्री कंगना रनौतने या सिनेमावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.“द काश्मीर फाईल्सच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. त्यांनी पूर्ण फिल्म इंडस्ट्रीचे जेवढे पाप होते, ते सर्व पाप धुवून टाकले आहेत. बॉलिवूडचेही पाप त्यांनी धुवून टाकले. हा चित्रपट इतका कौतुकास्पद आहे की जे इंडस्ट्रीवाले आपल्या बिळात लपून बसले आहेत, त्यांनी बाहेर येऊन याचं प्रमोशन केलं पाहिजे. नेहमी ते बकवास, सडलेल्या चित्रपटांचं प्रमोशन करतात”, असं ती म्हणाली. ‘द काश्मीर फाईल्स’बद्दल कंगनाने पहिल्यांदाच वक्तव्य केलेलं नाही. याआधीही तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली होती.

संबंधित बातम्या

थिएटरचा AC बंद पडला की मॅनेजरनं जाणीवपुर्वक ‘द काश्मीर फाईल्स’ बंद केला? नोएडात सिनेमा बघता बघता हिंदू-मुस्लिम वाद

The Kashmir Files: काश्मीरमधून पंडीतांनी पलायन केलं त्यावेळेस केंद्रात कुणाचं सरकार होतं? काँग्रेस नेते म्हणतात, भाजपला विचारा

तुमचा ‘द काश्मीर फाईल्स’ तर आमचे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रवादीच्या नव्या मागणीनं सरकारची गोची?

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....