Samrenu Marathi Movie : एकाच वाटेवरचे विरुद्ध दिशेचे प्रवासी, ‘समरेणू’ची प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Samrenu Marathi Movie : एकाच वाटेवरचे विरुद्ध दिशेचे प्रवासी, ‘समरेणू’ची प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
‘समरेणू’-चित्रपट

‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय…’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘समरेणू’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. हा सिनेमा 13 मे ला प्रदर्शित होणार आहे.

आयेशा सय्यद

|

Mar 16, 2022 | 11:43 AM

मुंबई : ‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय…’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘समरेणू(Samrenu) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. एम. आर. फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन महेश डोंगरे (Mahesh Dongre) यांनी केले आहे. सूरज- धीरज यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. या चित्रपटातील गाणी गीतकार गुरू ठाकूर (Guru Thakur) आणि क्षितीज पटवर्धन (Kshitij Patwardhan) यांनी लिहिली आहेत. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला (Kunal Ganjawala), निती मोहन (Neeti Mohan), आदर्श शिंदे (Adarsh Shinde) आणि अजय गोगावले (Ajay Gogawale) अशा दमदार गायकांचा आवाज लाभला आहे. धमाकेदार संगीत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती एम. आर. फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.

‘समरेणू’चा टीझर आऊट

‘समरेणू’ या आगामी मराठी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी एकाच वाटेने चालताना दिसत आहेत. पण एकमेकांच्या विरूद्ध दिशेने. त्यामुळे या सिनेमाच्या गोष्टीविषयी उत्सुकता आहे.

‘समरेणू’ या चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप समोर आली नसली तरी टिझरवरून ही एक प्रेमकहाणी असल्याचे दिसत आहे. सुरूवात महत्वाची नसलेल्या या प्रेमकहाणीचा शेवट काय असणार आहे, हे मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

सिनेमाची गाणी

‘समरेणू’  या चित्रपटातील गाणी गीतकार गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज लाभला आहे.

कधी प्रदर्शित होणार?

‘समरेणू’ हा सिनेमा 13 मे ला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाविषयी सिनेरसिकांमध्ये उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

थिएटरचा AC बंद पडला की मॅनेजरनं जाणीवपुर्वक ‘द काश्मीर फाईल्स’ बंद केला? नोएडात सिनेमा बघता बघता हिंदू-मुस्लिम वाद

The Kashmir Files: काश्मीरमधून पंडीतांनी पलायन केलं त्यावेळेस केंद्रात कुणाचं सरकार होतं? काँग्रेस नेते म्हणतात, भाजपला विचारा

तुमचा ‘द काश्मीर फाईल्स’ तर आमचे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रवादीच्या नव्या मागणीनं सरकारची गोची?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें