The Kashmir Files Box Office : ‘द काश्मीर फाईल्स’ची कमाईची सुनामी, 60 कोटीचा टप्पा पार, ‘गंगुबाई काठियावाडी’लाही पछाडणार?

The Kashmir Files Box Office : 'द काश्मीर फाईल्स'ची कमाईची सुनामी, 60 कोटीचा टप्पा पार, 'गंगुबाई काठियावाडी'लाही पछाडणार?
'गंगुबाई काठियावाडी', 'द काश्मीर फाईल्स'- सिनेमा

संजय लीला भंन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी आणि विवेक अग्नीहोत्री यांच्या 'द काश्मीर फाईल्स' यांच्यात कमाईबाबत काटें की टक्कर पहायला मिळेतेय. 'द काश्मीर फाईल्स' गंगुबाई काठियावाडी सिनेमाला मागे टाकणार का, अशी चर्चा सध्या होतेय...

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Mar 16, 2022 | 11:19 AM

मुंबई : सध्या बॉक्सऑफिसचा गल्ला ओसांडून वाहातोय. कारण अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे सध्या बॉक्सऑफिस गाजवत आहेत. अश्यात आता कोण जास्त गल्ला जमावणार आणि कोण शंभरी पार करणार याची लढाई सुरू झाली आहे. एकीकडे ‘द काश्मीर फाईल्स(The Kashmir Files) बॉक्सऑफिसवर धुमाकूळ करतोय. या सिनेमाने आतापर्यंत 60 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 8.50 कोटी, रविवारी 15.10 कोटी, सोमवारी 15.05 कोटी तर मंगळवारी 18 कोटींची कमाई ‘द काश्मीर फाईल्स’ने केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 60 कोटींहून जास्त कमाई केली आहे. दुसरीकडे सुपरहिट सिनेमांचे बादशाह संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकतोय. आलिया भटच्या (Alia Bhatt) कामाचं कौतुक होतंय. या सिनेमाने आतापर्यंत 109.50 कोटी इतकी कमाई केली आहे. त्यामुळे ‘द काश्मीर फाईल्स’गंगुबाई सिनेमाला मागे टाकणार का, अशी चर्चा सध्या होतेय.

काश्मीर फाईल्सची कमाई

‘द काश्मीर फाईल्स’ बॉक्सऑफिसवर धुमाकूळ करतोय. या सिनेमाने आतापर्यंत 60 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 8.50 कोटी, रविवारी 15.10 कोटी, सोमवारी 15.05 कोटी तर मंगळवारी 18 कोटींची कमाई ‘द काश्मीर फाईल्स’ने केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 60 कोटींहून जास्त कमाई केली आहे. याबाबत सिनेमांच्या ट्रेंडचे अभ्यासक तरण आदर्श यांनी ट्विट केलं आहे.

गंगुबाईची कमाई

संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकतोय. आलियाच्या कामाचं कौतुक होतंय. या सिनेमाने आतापर्यंत 109.50 कोटी इतकी कमाई केली आहे. या सिनेमाचा बोलबाला आहे. संजय लीला भंन्साळी यांच्या सिनेमाला ‘द काश्मीर फाईल्स’ टक्कर देतोय. त्यामुळे ‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईचा आलेख असाच चढता राहिला तर लवकरच हा सिनेमा ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमावर भारी पडेल, असं म्हटलं जातंय.

या राज्यात ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री

गुजरात, हरियाणा , कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यातही ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री करण्यात आला आहे. भाजपशासित राज्यात या सिनेमाला टॅक्स फ्री करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश राज्यातही ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तसे निर्देश दिले आहेत.

थिएटरचा AC बंद पडला की मॅनेजरनं जाणीवपुर्वक ‘द काश्मीर फाईल्स’ बंद केला? नोएडात सिनेमा बघता बघता हिंदू-मुस्लिम वाद

The Kashmir Files: काश्मीरमधून पंडीतांनी पलायन केलं त्यावेळेस केंद्रात कुणाचं सरकार होतं? काँग्रेस नेते म्हणतात, भाजपला विचारा

तुमचा ‘द काश्मीर फाईल्स’ तर आमचे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रवादीच्या नव्या मागणीनं सरकारची गोची?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें