AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Music Day 2021 | जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने गायिका ‘सावनी रविंद्र’ची चाहत्यांची खास भेट! नवं मल्याळम गाणं रिलीज

संगीत क्षेत्रात कायम नाविन्यपूर्ण प्रयोग करणारी, सुमधूर गळ्याची गायिका 'सावनी रविंद्र'ने (Savaniee Ravindrra) जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत 'वन्निदुमो अझगे' हे मल्याळम रोमँटिक गाणं रिलीज केलं आहे. राष्ट्रीय पुरस्कारानंतर ‘सावनी ओरीजनल’ या सीरीजमधील हे तिचं पहिलंच गाणं आहे.

World Music Day 2021 | जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने गायिका ‘सावनी रविंद्र’ची चाहत्यांची खास भेट! नवं मल्याळम गाणं रिलीज
सावनी रविंद्र
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 2:10 PM
Share

मुंबई : संगीत क्षेत्रात कायम नाविन्यपूर्ण प्रयोग करणारी, सुमधूर गळ्याची गायिका ‘सावनी रविंद्र’ने (Savaniee Ravindrra) जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत ‘वन्निदुमो अझगे’ हे मल्याळम रोमँटिक गाणं रिलीज केलं आहे. राष्ट्रीय पुरस्कारानंतर ‘सावनी ओरीजनल’ या सीरीजमधील हे तिचं पहिलंच गाणं आहे. या गाण्यात गायिका सावनी सोबत गायक अभय जोधपुरकर देखील आहे. हे गीत लक्ष्मी हीने लिहीलं आहे. तर, शुभंकर शेंबेकरने गाण्याला संगीत दिलंय. प्रेमाची नवी परिभाषा सांगणाऱ्या या गाण्याचं चित्रीकरण चेन्नईत झालं आहे (World Music Day 2021 Singer Savaniee Ravindrra released her new Malayalam song).

आजवर सावनीने मराठीसह, हिंदी, तमिळ, गुजराती, बंगाली, कोंकणी अश्या विविध भाषेत अनेक गाणी गायली आहेत. त्यामुळे तिचे भारतातचं नव्हे तर जगभर चाहते आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी या रोमँटिक मल्याळम गाण्याचं भरभरून कौतुक केलं आहे.

संगीताला भाषेचं बंधन नसतं!

गायिका सावनी रविंद्र तिच्या मल्याळम गाण्याविषयी सांगताना म्हणाली की, “संगीताला भाषेचं बंधन नसतं. संगीत हीच एक भाषा आहे असं मी मानते. आणि मी आजवर बहुभाषिक गाणी गायली. दाक्षिणात्य भाषेतील तमिळ, तेलुगू गाणी मी याआधी गायली. तर यापूर्वी मी मल्याळम भाषेत जिंगल्स गायल्या होत्या. मल्याळम भाषा तशी कठीण आहे. त्यामुळे  मी सतत मल्याळम गाणी ऐकायचे. माझा गायक मित्र अभय जोधपुरकर आणि शुभंकर आम्ही तिघांनी हे गाणं करायचं ठरवलं. आम्ही तिघं ही महाराष्ट्रातले आहोत. अभयने याआधी मल्याळममध्ये बरचं काम केलं आहे. त्यामुळे त्याचा अनुभव आमच्या गाठीशी होता.’’

गर्भवती असताना रेकॉर्डिंग!

पुढे ती म्हणते, “गाण्याचे चित्रीकरण चेन्नईत करण्यात आले. त्यावेळेस मी चार महिन्याची प्रेग्नेंट होते. त्यामुळे त्या परिस्थितीत मी मुंबईहून चेन्नईला गेले. आणि ते गाणं चित्रीत केलं. हे सर्व माझ्यासाठी खूप चॅलेंजींग होतं. आणि अर्थातच खूप आनंदाने मी हे चॅलेंज स्वीकारलं. तसेच माझे पती या गाण्याचे निर्माते डॉ. आशिष धांडे या संपूर्ण प्रवासात माझ्यासोबत होते. सध्या आम्ही आयुष्यातील एका सुंदर टप्प्यावर आहोत. त्यामुळे हे गाणं आम्हा दोघांसाठी खूप स्पेशल आहे.”

पाहा गाणं

(World Music Day 2021 Singer Savaniee Ravindrra released her new Malayalam song)

हेही वाचा :

लेक सुहानाची ‘फादर्स डे’ पोस्ट पाहून शाहरुख खान झाला भावूक, प्रतिक्रिया देताना म्हणाला…

World Music Day 2021 | बॉलिवूडच्या ‘या’ दमदार गाण्यांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, आवर्जून ऐका ‘ही’ लोकप्रिय गाणी!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.