आतापर्यंतचं सर्वात डबल मीनिंग गाणं, पुरुषही चोरुन चोरुन ऐकतात!
Marathi double meaning song : वरवर साधे वाटणारे शब्द आणि त्यातून निघणारे मिश्किल अर्थ यामुळे या गाण्याची चर्चा कायम असते. नेमकं कोणतं आहे हे गाणं?

काही गाणी अशी असतात, जी ऐकताना आजूबाजूला कोण बसलंय याचाही विचार करावा लागतो! शब्द अगदी साधे, चाल ठेका धरायला लावणारी आणि गाण्याची शैली अशी की ऐकताना हसू आवरणं कठीण. मराठी चित्रपटसृष्टीत अशाच एका गाण्याने अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं अनेकांना आवडत असलं तरी ते ऐकताना मात्र काही जण आवाज जरा कमीच ठेवतात. दादा कोंडके यांचं हे गाणं म्हणजे ‘वर ढगाला लागली कळ’.
गाण्याचे शब्द ऐकले की हसू आवरणार नाही!
दादा कोंडके म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो त्यांचा भन्नाट विनोद, मिश्किल संवाद आणि शब्दांमधून हसवण्याची अनोखी शैली. त्यांच्या चित्रपटांमधील अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. ‘वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ’ ही गाण्याची सुरुवातीची ओळ ऐकली की पावसाचं काहीतरी वर्णन सुरू असल्याचं वाटतं. मात्र, गाणं पुढे ऐकत राहिलं की त्यातील शब्दांची गंमत लक्षात येते.
या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील शब्दरचना आणि त्यातून निर्माण होणारी मिश्किलता. गाणं ऐकताना प्रत्येकाला त्याचा आनंद आपल्या पद्धतीने घेता येतो. त्यामुळेच हे गाणं केवळ पावसाळी गाणं म्हणून लक्षात राहत नाही, तर दादा कोंडके यांच्या खास विनोदी शैलीची आठवण करून देतं. काही गाणी मोठ्या आवाजात सगळ्यांसोबत ऐकली जातात, तर काही गाणी मात्र एकट्यात ऐकताना अधिक मजा देतात. या गाण्याबाबतही असंच काहीसं म्हणता येईल.
महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजाची जादू
‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ या चित्रपटातील हे गाणं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलं आहे. रामलक्ष्मण यांचं संगीत आणि दादा कोंडके यांचं गीतलेखन यामुळे गाण्याला एक वेगळीच रंगत आली आहे. त्याची ठेका धरायला लावणारी चाल आणि गाण्यातील मिश्किल शब्द आजही श्रोत्यांना आकर्षित करतात.
दादा कोंडके यांच्या गाण्यांची खासियत म्हणजे साध्या शब्दांतूनही ते प्रेक्षकांना हसवू शकत होते. ‘वर ढगाला लागली कळ’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. काळ बदलला, गाण्यांची आवड बदलली, तरी या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही कुठे हे गाणं वाजलं की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि चेहऱ्यावर नकळत हसू उमटतं.