Marathi Serial : ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेला नवं वळण, होणार काकीसाहेबांची एंट्री

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. (Marathi Serial: ‘Fulala Sugandh Maticha’ series will get a new twist)

Marathi Serial :  ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेला नवं वळण, होणार काकीसाहेबांची एंट्री
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 2:16 PM

मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. कीर्तीला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी जीजी अक्कांनी फक्त 15 दिवसांची मुदत दिली होती. पंधरा दिवसांचा हा अवधी आता संपत आला आहे. या पंधरा दिवसात कीर्ती स्वत:ला सिद्ध करु शकली नाही तर तिला घर सोडून जावं लागणार आहे. कीर्तीच्या खरेपणाची परीक्षा घेण्यासाठी आता मालिकेत काकीसाहेबांची एंट्री होणार आहे.

मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक काकीसाहेबांची भूमिका साकारणार आहेत. जीजी अक्कांप्रमाणेच काकीसाहेबांचाही घरात धाक असणार आहे. कुणीही त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. त्यामुळे कीर्तीची बाजू त्या समजून घेतील की कीर्तीला आणखी कठोर परीक्षा द्यावी लागणार आता हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. महत्वाचं म्हणजे कीर्तीच्या या कसोटीच्या काळात शुभम तिला कशी साथ देणार याची देखिल उत्सुकता आहे.

Marathi Serial, Photo

मालिकेतल्या या नव्या वळणाविषयी सांगताना कीर्तीची भूमिका साकारणारी समृद्धी केळकर म्हणाली, ‘कीर्ती पहिल्यांदाच काकीसाहेबांना भेटणार आहे. त्यामुळे ती अतिशय उत्सुक आहे. काकीसाहेबांचा स्वभाव माहित नसल्यामुळे पुढे काय वाढून ठेवलं आहे याची कीर्तीला कल्पना नाही. त्यामुळे काकीसाहेबांचं मन जिंकण्याची एकही संधी ती सोडणार नाहीय. काकीसाहेबांच्या परीक्षेत कीर्ती पास होणार का हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे.’

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.